सकाळ ब्रेकिंग - कोल्हापुरात सापडला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

मलकापूर पासून पावनखिंडीतकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर अंतरावर उचलत या गावात हा पॉझिटिव्ह रूग्ण सापडाला आहे.

कोल्हापूर - शाहूवाडी येथील तीस वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  शाहूवाडी तालुक्यातील हा पहिला रूग्ण आहे. यामुळे आता चिंतेत भर पडली आहे. जिल्हा वैद्यकीय पथक येथील परिसरात रवाना झाले असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा - Video - मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी शिकविला धडा

मलकापूर पासून पावनखिंडीतकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर अंतरावर उचत या गावात हा पॉझिटिव्ह रूग्ण सापडाला आहे. तो दिल्लीत झालेल्या मकरजच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तो दिल्लीतून आल्यानंतर कोठे- कोठे गेला होता याचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहेत. शिवाय दिल्लीतून आल्यानंतर त्याने वैद्यकीय चाचणी का करून घेतली नाही याचीही चाैकशी केली जात आहे. दरम्यान, या रूग्णाला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखर करण्यात आले असून तो राहत असेला परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन प्रशानाणे केले आहे. 

हे पण वाचा - Video - शिकलेल्यांना देव बुध्दी देवो! कोरोनाबाबत शेतात राबणाऱ्या महिलांचा सल्ला

दरम्यान, कोल्हापुरातील पहिल्या कोरोना रूग्णाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा कालच अहवाल आला आहे. या बातमीने जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता. परंतु, आता हा रुग्ण आढळल्याने आणखीनच चिंतेत भर पडली आहे. परवाच बावडा येथील मराठा काॅलनीतील महिलेला लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हातील प्रशासन कोरोनाशी सामना करत असतानाच या नवीन घटना समोर येत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more corona positive patient fund kolhapur