The positive patient in the isolation at Rajapur went to Kudal 
कोकण

राजापूर येथील विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण गेला कुडाळला 

सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी) - गेल्या चार दिवसांमध्ये तालुक्‍यात सोळाजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी आज नव्याने तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या 491, तर सद्यःस्थितीत कार्यरत रुग्णसंख्या 59 झाली आहे. दरम्यान, घरात विलगीकरणातील पॉझिटिव्ह रुग्ण कुडाळला न सांगता गेल्याची घटना उघड झाली आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना घरातील स्वतंत्र खोलीमध्ये विलगीकरणात असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तेथून अन्य ठिकाणी निघून गेल्याची धक्कादायक घटना तालुक्‍यामध्ये घडली आहे. ती कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती त्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मूळ गावी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तेथील स्थानिक प्रशासनाला त्याची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता संबंधित व्यक्ती गायब झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

शिमगोत्सवाच्या तोंडावर गेल्या महिन्यात तालुक्‍यामध्ये नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने तालुक्‍यामध्ये डोकेवर काढले आहे. गेल्या चार दिवसांमध्ये 16 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले. आज नव्याने तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये ओणी, केळवली आणि करक येथील रुग्णांचा समावेश आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ल्यांचा कहर! ८२२ ड्रोन, भीषण आग अन् ६ जणांचा मृत्यू... मॉस्कोवर मोठा हल्ला

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

SCROLL FOR NEXT