कोकण

रसायनीला जोडणाऱ्या राज्य मार्गांचे लवकरच होणार चौपदरीकरण

लक्ष्मण डुबे

रसायनी (रायगड) : रसायनीला जोडणाऱ्या राज्य मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग, पेण कार्यालयामार्फत रस्त्यांचे चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू केल्या आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणानंतर औद्योगिक क्षेत्र तसेच परिसरातील गावांकडील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.  

राष्ट्रीय महामार्गावर मुंबई-पुणे दांडफाटा आणि कोनफाटा येथे दोन ठिकाणी तसेच राष्ट्रीय मुंबई गोवा महामार्गावर आपटेफाटा येथे आसा रसायनीतील तीन ठिकाणी जोडणारा राज्य मार्ग हा साधारण सव्वीस किलोमीटर अशा अंतराचा रस्ता आहे. रसायनीनंतर पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र आणि क्षेत्राबाहेर कारखाने सुरू झाले आहे. तर आता अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक विकास झपाट्याने होऊ लागला आहे. तसेच औद्योगिक विकासामुळे परीसरातील बहुतेक गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रसायनीतील या रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे. या रस्त्याचे रूंदीकरण आणि मजबूतीकरण करा, अशी मागणी कारखानदार व नागरिक करत आहेत. 

तसेच पनवेलहून रोहापर्यंत लवकर मध्य रेल्वेच्या फे-या सुरू होणार असल्याने परिसरात अनेक गावांच्या मोठ्या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. वाढते औद्योगिकरण व झपाट्याने होणारे शहरीकरण भविष्यात वाहनांची वर्दळ अजून वाढणार असल्याने परिसरातील रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचे नियोजनासाठी प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग, पेण कार्यालयामार्फत सुरू आहे. तसा रूंदीकरणाबाबत परीसरात सर्व्हे सुरू असल्याचे दिसून आले. 

यापूर्वी भारत उद्योग कंपनीने बीओडी तत्वावर रसायनीला जोडणारा हा राज्यमार्ग 24 एप्रिल 2007 पासून घेतला होता. टोल वसुलीसाठी दांडफाटा, कोनफाटा आणि आपटेफाटा येथे टोल नाके उभारण्यात आले होते. हे टोल नाके शासनाच्या आदेशाप्रमाणे 1 जुलै 2014 पासून बंद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AFG A: दोन जीवदान मिळूनही वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला; अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने त्याला कसा बाद केला? Video Viral

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT