postman 
कोकण

कोरोनाने डाकसेवकाचा मृत्यू झाल्यास वारसाला मिळणार नोकरी; मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : कोरोनाने(covid 19) ग्रामीण डाकसेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला विनाविलंब त्वरित खात्यात नोकरीत सामावून घ्या, असे आदेश नवी दिल्ली(new delhi) येथून देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील तीन लाख ग्रामीण डाकसेवकांना (postman)केंद्राने दिलासा दिला आहे. केंद्राने हा एक महत्वपूर्ण आदेश दिल्याने माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी, सचिव जे. एम. मोडक व अध्यक्ष हरियान (Former District President Abhimanyu Dhuri, Secretary J. M. Modak and President Haryana)यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाधान व्यक्त केले आहे.(postman-family-get-a-job-centre-orders-kokan-marathi-news)

भारतीय टपाल खाते गेली दीडशे वर्षे ग्रामीण व शहरी जनतेची सेवा करत आहे. एक लाख 65 हजार टपाल कार्यालयांद्वारे 130 कोटी जनतेची सेवा करत आहे. जनतेला ग्रामीण टपाल जीवन विमा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, आरडी, सेव्हिंग बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, स्पीड पोस्ट, रजिस्टर पार्सल, पैसे देणे-घेणे मनिऑर्डर, सुकन्या सुमृद्धी योजना आदी सेवा जनतेला देत आहेत. शाखा पोस्टमास्तर, ग्रामीण पोस्टमन, भारतीय टपाल खाते जगातील नंबर एकचे खाते आहे. डिजिटल युगात या टपाल खात्याने भरारी घेतली आहे.

कोरोना काळात जनतेला सर्व टपाल खात्याच्या सर्व सोयीसुविधा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आल्या. कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता, धैर्याने कोरोना संकटाला सामोरे जात ग्रामीण डाकसेवक रोज प्रत्येकाच्या घरी टपाल सेवेचे वितरण करत आहेत. अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवकांचे जनरल सेक्रेटरी एस. एस. महारेवय्या यांनी ग्रामीण डाक सेवकांचे प्रश्न संसदेसमोर ठेवून खासदारांनी हा प्रश्न संसदेत लावून धरला व भारतातील 3 लाख ग्रामीण डाकसेवकांना न्याय मिळाला, असे प्रसिद्धी पत्रकात धुरी, मोडक व हरियान यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup विजेत्या संघाला ICC कडून नाही, तर BCCI कडून मिळणार कोट्यवधींचं बक्षीस; घोषणाही झाली

Crime: संतापजनक! हातापायावर व्रण येईपर्यंत काठीचे १०५ फटके अन्...; शिक्षकाची १० वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

Viral Video: ५ मजल्यांवरून थेट खाली! मालेगाव महापालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले जीव… थरारक क्षण! व्हिडिओ व्हायरल

Rose Day 2026 Special: ग्लॅमरस लूक हवा आहे? ‘या’ मॅक्सी ड्रेसेस स्टाईल करा आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घ्या

"माझ्यावर टीका करून त्यांना झोप लागतेय.." सचिन पिळगावकर यांचे ट्रोलर्सना खडेबोल; "वैयक्तिक आयुष्यावर.."

SCROLL FOR NEXT