Vinayak Raut Google
कोकण

विनायक राऊतांना 'रिफायनरी' नकोच: प्रमोद जठारांचा घणाघात

एकनाथ पवार : सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : रिफायनरी प्रकल्पामुळे या भागाचा कायापालट होणार होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना हा प्रकल्प पाहिजे आहे; परंतु कोकण विकासाच्या मुळावर उठलेला एकमेव माणुस खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनाच हा प्रकल्प नको आहे, अशी खरमरीत टिका माजी आमदार प्रमोद जठार (Pramod Jathar)यांनी येथे केली.

माजी आमदार जठार हे कोकिसरे येथील भुयारी मार्गाच्या सयुंक्त मोजणीच्या शुभारंभाकरीता आले होते. त्यावेळी त्यांना नियोजीत वैभववाडी-कोल्हापुर रेल्वेमार्गाबाबत विचारले असता ते म्हणाले, "वैभववाडी-कोल्हापुर रेल्वेमार्ग होण्यासाठी अनेक प्रकारचे कंगोरे होते. एकमेकावर अवलंबून अनेक गोष्टी होत्या. त्यातुन हा ३ हजार २०० कोटीच्या मार्गाला हिरवा कंदील देण्यात आला होता. रिफायनरी प्रकल्प, विजयदुर्गचे नियोजीत जेएनपीटी बंदर असे काही संदर्भ त्याला होते. भविष्यात विजयदुर्ग बंदराला रेल्वेने जोडण्याचे नियोजन हा मार्ग मंजुर करताना होते; परंतु प्रकल्पच न झाल्यामुळे या रेल्वेमार्गाला निधी मिळु शकलेला नाही. रिफायनरी प्रकल्पामुळे या भागाचा विकास होणार होता. कित्येक तरूणांना या प्रकल्पातून रोजगार मिळणार होता. कोकणचा कायापालट या प्रकल्पाच्या माध्यमातून होऊ शकेल इतकी क्षमता या प्रकल्पात होती. या प्रकल्पामध्ये साधारणपणे ७०० ते ८०० पेट्रोलियम प्रॉडक्ट होणार होते."

ते पुढे म्हणाले, "रिफायनरी प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले एवढेच नाही तर खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील हा प्रकल्प हवा आहे; परंतु कोकण विकासाच्या मुळावर उठलेल्या एकमेव माणसाला हा प्रकल्प नको आहे तो माणुस म्हणजे या भागाचे खासदार विनायक राऊत आहेत. कधीकाळी नारायण राणेंनी चिपी विमानतळासाठी जमिनीचे भुसंपादन करून घेतले म्हणून नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुम्हाला करायला मिळाले. खासदार राऊत हे कोकण विकासाच्या मुळावर उठलेले आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT