कोकण

गस्तीनौकेने पकडलेला पर्ससीनचा ट्रॉलर पळवला

प्रशांत हिंदळेकर

मालवण - येथील किल्ल्यानजीकच्या समुद्रात काल सायंकाळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने पकडलेला रत्नागिरीतील एमसीयान अदनान IND - MH- ४ MM- ४२५० हा पर्ससीनचा ट्रॉलर काळोखाचा फायदा उठवत पळवून नेण्यात आला. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.   

पकडलेल्या ट्रॉलरवरील तांडेल अलीअब्बास दड्डी याला मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. अन्य खलाशांची ओळखपत्रे ही घेण्यात आली. तपासणीत मासेमारीचा कोणताही परवाना आढळून न आल्याने संबधितास ट्रॉलर बंदरात आणण्याच्या सूचना देवगडचे परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी दिली. या ट्रॉलरवर अंदाजे पाचशे किलो बांगडा मासळी तसेच अन्य प्रकारची मासळी होती. अशी माहिती मत्स्यव्यवसायच्या।अधिकाऱ्यांनी दिली. मात्र बंदरात निघालेली गस्तीनौका पाहून काळोखाचा फायदा घेत त्या ट्रॉलरवरील दुसऱ्या तांडेलने ट्रॉलरसह पळ काढला. 

अखेर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठत पर्ससीन ट्रॉलरचा मालक इजायस इस्माईल (रा. रत्नागिरी) याच्या विरोधात तक्रार दिली. यावेळी मच्छीमार नेते बाबी जोगी, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा उपस्थित होते. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा तसेच सागरी मासेमारी अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT