pali
pali 
कोकण

सुधागडमध्ये भात खरेदी केंद्र त्वरीत सुरु करा

अमित गवळे

पाली - सर्वत्र भात कापणी व झोडणीची कामे पुर्णत्वास आली आहेत. त्यामुळे भातविक्री करण्यासाठी शेतकर्‍याची लगबग सुरु आहे. शासनाकडून भाताचा हमीभाव जाहीर होउन देखिल सुधागड तालुक्यात भातखरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुधागड तालुक्यात शासनाने निर्देशित केलेल्या सर्व ठिकाणी भात खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावेत या मागणीचे निवदेन ह.भ.प महेश पोंगडे महाराज यांच्यासह अनेक शेतकरी व आदिवासी बांधवांनी बुधवारी (ता.३१) पाली-सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना दिले.

हे निवदेन निवडणुक नायब हसिलदार एस.ए.राउळ व दत्तगुरु सरनाईक यांनी स्विकारले. रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असे. एकेकाळी भाताची निर्यात होणार्‍या जिल्ह्यात धान्याची आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. अशातच नैसर्गीक आपत्तीच्या घेर्‍यात शेतकरी दिवसागणिक पिचत चालला आहे. कर्जाच्या बोज्याखाली दबून शेतकर्‍याला जिवनमरणाशी सघर्ष करावा लागत आहे. शेतकरी राजाच्या पदरी नित्याचीच घोर निराशा येत आहे. शासनाकडून भाताला हमिभाव जाहीर झाला असून अनेक ठिकाणी अद्यापही भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाहीत. शेतकर्‍याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नाईलाजाने व्यापार्‍याकडे अल्पदराने भातविक्री करीत आहे. परिणामी शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने शेतकर्‍याला अधिक वेठीस न धरता जलदगतीने भात खरेदी केंद्र सुरु करावेत व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी सुधागड तालुक्यातील शेतकर्‍यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शेतकर्‍यांच्या निवेदनाची दखल घेवून लवकर कार्यवाही केली जाईल असे प्रशासनकाडून आश्वासन देण्यात आले. 

यावेळी सत्यशोधक वारकरी सांप्रदाय रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प महेश पोंगडे महाराज, सुरेश आंग्रे, वंदिप जाधव, श्रीकृष्ण ठाकूर, सुरेश तटकरे, मंगेश पालांडे, राकेश साजेकर, नंदू कुडपणे, जगन्नाथ पवार, रविंद्र वानखडे आदिंसह आदिवासी बांधव, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT