Khalapur Irshalwadi Landslide  Sakal
कोकण

Khalapur Irshalwadi Landslide : "भावजय गेली, लेकरं गेली, आता कुणी नाही राहिलं रं बाबा..." नातेवाईकांचा टाहो

इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोेर आली आहे.

दत्ता लवांडे

Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापुर येथील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये मोठी जिवीतहानी झाली आहे. काल रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना दरड कोसळली. या घटनेत आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून बचावपथकांकडून अनेक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, काल रात्री या परिसरात मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर आज सकाळपासून बचावकार्याला वेग आला असून आत्तापर्यंत ८० जणांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृत नागरिकांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.

"माझी भावजय गेली, तिची लेकरं पण गेली, एक मुलगी गेली.. मुलगा शाळेत जात होता, अवघा १५-१६ वर्षाचा मुलगा होता.. माझं सगळं गेलं रे बाबा... आता काय करायचं आम्ही... देवा आम्हाला तरी कशाला जगू दिलंस आम्हाला पण घेऊन जायचं ना... आता कसं राहायचं आम्ही" असं म्हणत या नागरिकांनी टाहो फोडला आहे.

"माझी सगळीच गेली, भाऊ गेल्या , नंदा गेल्या, वहिन्या गेल्या, आम्हीच राहिलो...." असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश नागरिकांनी केला आहे.

बचावकार्यादरम्यान एनडीआरएफ जवानांचा मृत्यू

आत्तापर्यंत एनडीआरएफचे ४ बचावपथके घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवत असताना एका एनडीआरएफ जवानांचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून घटनेचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत हे घटनास्थळी दाखल झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंट्रोल रूममधून मदतकार्यासंदर्भात आढावा घेतला आणि सूचना दिल्या आहेत.

या गावामध्ये ४८ कुटुंब असून २२८ नागरिक राहत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आम्ही दोन हेलिकॉप्टर तयार ठेवली आहेत. बचावकार्यमध्ये ट्रेकरचाही सामावेश असून पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT