rice crop  sakal
कोकण

Rain News : मुसळधार पावसामुळे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्याखाली !

पिके कुजण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

Rain News : सिंधुदुर्ग जिल्हात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भातपिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भातरोप पुनर्लागवड केलेल्या क्षेत्रापैकी २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

या वर्षी मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाले. परिणामी, भात पेरणीदेखील लांबल्याने भात लागवडीयोग्य रोप होण्यास जुलै महीना उजाडला. जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. परंतु, जुलैत या पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केली.मात्र आता पिकांचे नुकसान होत आहे.

धामापूर : गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धामापूर, काळसे गावातील कर्ली नदी किना असलेल्या भातशेतीत अशाप्रकारे पाणी घुसलेले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT