कोकण

राणेंच्या स्वागताचे बॅनर फाडल्या प्रकरणी राजन साळवींवर गुन्हा

- राजेश शेळके

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लावलेला बॅनर फाडून टाकले.

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यावर त्याचे पडसाद रत्नागिरीत (ratnagiri) उमटले. आमदार राजन साळवी (rajan salavi) यांच्या समवेत दहा संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लावलेला बॅनर फाडून टाकले. तसेच मनाई आदेशाचा भंग करीत सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येत घोषणा देऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यामध्ये आमदार राजन साळवी, संजय साळवी, परेश खातू, प्रसाद सावंत, प्रकाश सावंत, प्रशांत साळुंखे यांच्यासह शिवसेनेच्या ८ ते १० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार महेश कुबडे, यांनी ही तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT