nilesh rane refinery project latest update esakal
कोकण

रिफायनरीसाठी काही चिरीमिरी लोक विरोध करत आहेत पण..., : निलेश राणे

बारसू-सोलगावसह नाणारवासीय सुद्धा रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक आहेत

सकाळ वृत्तसेवा

बारसू-सोलगावसह नाणारवासीय सुद्धा रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक आहेत.

ओरोस - बहुचर्चित असलेला राजापूर रिफायनरी प्रकल्प होणारच, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारसू-सोलगावसह नाणारवासीय सुद्धा रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक आहेत. याबाबत नाणारवासीयांनी सुद्धा रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन समर्थन असल्याचे सांगून आपल्या जमिनीचे सातबारे त्यांच्याकडे दिलेत. (nilesh rane refinery project latest update)

मुख्य म्हणजे राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी सुद्धा रिफायनरी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्‍यातील रिफायनरीला कोणताही विरोध राहिलेला नाही, असे निलेश राणे म्हणाले. राज्य शासनाच्या एमआयडीसी विभागाने केंद्र सरकारला पत्र पाठवत हा प्रकल्प व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला विरोध राहिलेला नाही. काही चिरीमिरी लोक विरोध करीत आहेत; पण त्याला कोण महत्व देत नाहीत, असे यावेळी राणे यांनी सांगितले.

राणे यांनी प्रमोद जठार यांनी नुकतीच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांची भेट घेतली. येथील वस्तुस्थिती त्यांना सांगितली. त्यामुळे आता केंद्र सरकार रिफायनरी होण्यासाठी पाऊले उचलणार आहे. तसा शब्द पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी दिला आहे, असेही निलेश राणे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT