शोषखड्ड्यातून स्वच्छता, रोजगार
शोषखड्ड्यातून स्वच्छता, रोजगार  sakal
कोकण

राजापूर : शोषखड्ड्यातून स्वच्छता, रोजगार निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : घरोघरी तयार होणाऱ्या कचरा आणि सांडपाण्याचे योग्य पद्धतीने संकलन आणि विघटन होण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावोगावी गेल्या आर्थिक वर्षामध्ये १ हजार २९२ शोषखड्डे खोदण्यात आले आहेत. त्यातून घरोघरी निर्माण होणारा कचरा आणि सांडपाण्याची घरपरिसरामध्ये योग्य पद्धतीने विल्हेवाट लागताना लोकांच्या हाताला काम अन् रोजगारही उपलब्ध झाला आहे. कचऱ्याची उत्तम विल्हेवाट, सांडपाणी सर्वत्र पसरत नसल्याने दुर्गंधी नाही, अन्‌ गटारांचा खर्च वाचला ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. या योजनेतून खोदण्यात आलेल्या शोषखड्ड्यातून १७ लाख ७० हजार ५२० रुपयांची गेल्या आर्थिक वर्षामध्ये उलाढाल झाली आहे.

त्यातून, ६ हजार २१० लोकांना रोजगार मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी शोषखड्डे खोदण्याची महत्वाकांक्षी योजना अद्यापही गावोगावी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शोषखड्ड्यांच्या संख्येमध्ये आणखीन भर पडणार आहे. त्यातून, आणखीन काही लोकांना रोजगार मिळणार आहे.

गावातील विविध विकासकामांना चालना देताना लोकांच्या हाताला काम देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गावोगावी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शोषखड्डे खोदून कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा निर्धार गटविकास अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्यातून, हजारो शोषखड्ड्यांची खोदाई होताना ६ हजाराहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. त्याचवेळी घरोघरी निर्माण होणार्‍या विविध प्रकारच्या कचरा आणि सांडपाण्याची शोषखड्ड्यांद्वारे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य झाले आहे. त्याचवेळी लोकांच्या हाताला काम मिळताना रोजगारही मिळत आहे.

दृष्टिक्षेपात राजापूर

एकूण शोषखड्डे १२९२

एकूण खर्च १७,७०,५२० रुपये

मनुष्यदिन निर्मिती ६२१०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT