सायबाचे धरण sakal
कोकण

राजापूर : सायबाचे धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित

राजापूर पालिका; पाणी प्रदूषण करणाऱ्यांवर करणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : राजापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या ठिकाणची जलव्यवस्था स्रोत प्रदूषित झाल्यास त्यातून शहरामध्ये विविध रोग वा साथींचा प्रादुर्भाव वा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे येथील स्रोताला नगर पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून, येथील जलस्रोत दूषित करण्यासह त्याला हानिकारक ठरणारे कृत्य करणाऱ्‍यांच्या विरोधात पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे कृत्य करणाऱ्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिला आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधकाम झालेले कोदवली येथील सायबाचे धरण गेल्या सुमारे १४० वर्षांहून अधिक काळ शहराला पाणीपुरवठा करत आहे. या ठिकाणाहून पाणीपुरवठा होण्यामध्ये अन्य जलस्रोतांच्या तुलनेमध्ये फारसा खर्च होत नसल्याने येथील पाणीपुरवठ्याला विशेष महत्त्व आहे; मात्र, लोकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हा जलस्रोत दूषित होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या जलव्यवस्था स्रोतास हानिकारक ठरतील, अशी कृत्य करण्यास सक्त मनाई केली असून अशी कृत्य करणाऱ्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी भोसले यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT