rashtrawadi party election run on self confidence in ratnagiri 
कोकण

निवडणुकीसाठी बैठकांचा धडाका ; राष्ट्रवादीची स्वबळाची मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रत्नागिरी तालुक्‍यात स्वबळासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवार उभे करण्यासाठी ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांतिक सदस्य बशिर मुर्तुझा, माजी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश मयेकर यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. शक्‍य आहे तिथे महाविकास आघाडी केली जाईल, अन्यथा स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणुका लढण्याची तयारी राष्ट्रवादीने केलीय.

तालुक्‍यात राष्ट्रवादीची ताकद विधानसभा निवडणुकीत दिसून आली. यापूर्वी बशिर मुर्तुझा यांना १५ हजार मते मिळाली होती. त्यानंतर माजी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांना गेल्या निवडणुकीमध्ये ३३ हजार मते घेतली होती. त्यामुळे तालुक्‍यातील काही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची सत्ता येऊ शकते, असे चित्र आहे. रत्नागिरी तालुक्‍याची धुरा बशिर मुर्तुझा आणि सुदेश मयेकर यांनी घेतली. तालुक्‍यामधील कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरवात झाली.

तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा परिषद प्रमुखांची आणि पंचायत समिती गण प्रमुखांच्या बैठका होणार आहेत. तालुक्‍यातील युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर प्रचाराची धुरा देणार आहे. निवडणुकीसाठी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष जुबेरभाई काझी, माजी जिल्हा युवक कार्याध्यक्ष राजन सुर्वे, युवक तालुका अध्यक्ष सिद्धेश शिवलकर, महिला तालुका अध्यक्षा शमिमजी नाईक, महिला विधानसभा क्षेत्राध्यक्ष नसिमाभाभी डोंगरकर, ग्रा. पं. सदस्य उझेर काझी, सज्जन लाड आदीनी काम सुरू केले आहे. 

चर्चेत असलेल्या सुर्वेंचा पक्षाला फायदा

रत्नागिरी तालुकाध्यक्षपदाच्या चर्चेत असलेले राजन सुर्वे यांनी याआधी अनेक ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार उभे करून निवडून आणले आहेत. त्याचा अभ्यास आणि जनसंपर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदेशीर ठरेल. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे राहाणारे अनेक गाव पॅनेलचे प्रमुख मुर्तुझा, मयेकर यांच्या संपर्कात आहेत.

"चाचपणी केल्यानंतर आघाडीसाठी स्थानिक कार्यकर्ते अनुकूल असतील, त्या ग्रामपंचायतीमध्ये आघाडीविषयी बोलणी करणार. कार्यकर्त्यांमध्ये अनुकूलता नसेल तर त्या ठिकाणी स्वतंत्र पॅनेल करून निवडणूक लढवू."

- बशिर मुर्तुझा

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT