कोकण

दिलासादायक! रत्नागिरीत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

राजेश कळंबटे/

रत्नागिरी: जिल्ह्यात शनिवारी (ता. 8) झालेल्या दोन हजाराहून अधिक चाचण्यांत 484 कोरोना बाधित (Covid Infected) रुग्ण सापडले. पूर्वीच्या तुलनेत बाधित संख्या कमी झाली असून बरे होणाऱ्यांचा आकडा दिलासादायक आहे. दिवसभरात 653 रुग्ण कोरोनमुक्त (corona defeat) झाले. मात्र 18 मृतांची नोंद झाली असून त्यात चोवीस तासातील 13 जण आहेत.

ratnagiri 653 defeat people covid 19 update marathi news

आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात शनिवारी 2, 305 चाचण्या झाल्या. त्यात 1, 821 जणांचे अहवाल अबाधित आहेत. बाधितांमध्ये आरटीपीसीआर चाचणीत 245 तर अँटीजेन चाचणीतील 239 रुग्ण आहेत. मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत होता. मात्र आज सर्वाधिक चाचण्या झाल्या असतानाचा बाधितही कमी सापडले आहेत. कोरोनाचा जोर ओसरण्याची लक्षण असल्याचे हे चिन्ह ठरू शकते.

आजच्या बाधितांमध्ये सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यात 166 तर त्या खालोखाल चिपळुणात 90 जण आहेत. दापोली 40, खेड 54, गुहागर 32, संगमेश्वर 32, लांजा 29, राजापूर 39 रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या 26 हजार 385 जाऊन पोहचली आहे.बाधित रुग्ण घट झाली असतानाच सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

दिवसभरात 653 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 75.20 टक्के झाला. चोवीस तासात 13 जण मृत पावले असून मागील 5 जणांची आज नोंद झाली आहे. सर्वाधिक 5 मृत्यू रत्नागिरी तालुक्यातील आहेत. संगमेश्वर 2, गुहागर 2, लांजा 3, राजापूर 2, खेड 1, चिपळूण 3 मृत आहेत. आतापर्यंत एकूण मृत 791 इतके आहेत. हा दर 2.99 टक्के आहे. सध्या उपचाराखाली रुग्ण संख्या 5 हजार 751 आहे.

* आजचे बाधित 484

* एकूण बाधित 26385

* आजचे अबाधित 1821

* एकूण अबाधित 1, 35, 906

* एकूण मृत्यू 791

* उपचाराखाली 5751

ratnagiri 653 defeat people covid 19 update marathi news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT