Ratnagiri  sakal
कोकण

रत्नागिरी : मुरुड किनाऱ्यावरील चेंजिंग रूम जमीनदोस्त

ही परिस्थिती गेली अनेक वर्षे होती.

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : दापोली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेली आणि कित्येक वर्षे धोकादायक झालेली चेंजिग रूम जमीनदोस्त झाली आहे. तर अजून स्वच्छतागृह मात्र धोकादायक स्थितीत उभे आहे.

पर्यटकांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर कपडे बदलता यावेत, यासाठी मुरूड समुद्रकिनाऱ्यावर चेजिंगरूम तसेच स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती; मात्र पहिल्याच पावसात या इमारती खचून धोकादायक झाल्या होत्या. ही परिस्थिती गेली अनेक वर्षे होती. या कामी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता, तो आता वाया गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पहिल्याच पावसात अर्थात समुद्राच्या उधाणाच्या भरतीने ही बांधकामे उद्‌घाटनाआधीच खराब झाली होती. त्यानंतर ती वापरण्यासाठी धोकादायकही झाली होती. ही बांधकामे पाडून टाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता; मात्र तरीही अनेक वर्षे ही बांधकामे पाडण्यात आली नाहीत. यावर्षी समुद्रात आलेल्या उधाणाच्या भरतीच्या लाटांच्या तडाख्याने ही चेंजिंग रूम जमिनदोस्त झाली. स्वच्छतागृह मात्र अद्याप जमिनदोस्त झाले नसले तरी कधीही पडण्याच्या स्थितीत आहे. धोकादायक बांधकाम काढून टाकण्याचे काम ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग करू शकले नाही, तेच काम समुद्राने केल्याची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT