कोकण

रत्नागिरी - दादर पॅसेंजर मंगळूरपर्यंत

राजेश कळंबटे

रत्नागिरी - देखभाल दुरुस्तीची यंत्रण मंगळूर येथे सुरू करण्यात येणार असल्याने रत्नागिरी-दादर पॅसेंजर मडगावहून पुढे मंगळूरपर्यंत नेण्यात येणार आहे. ही गाडी वेगवेगळी असून रेक फक्त पुढे नेण्यात येतात. या रेल्वेत रत्नागिरीतील प्रवशांसाठी आरक्षित डबे ठेवले जातील, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.

येथे पत्रकारांशी बोलताना श्री. गुप्ता म्हणाले की, गणेशोत्सवात आठ ते दहा लाख प्रवाशांनी जादा गाड्यांचा लाभ घेतला. गतवर्षीपेक्षा पन्नास कमी गाड्या सोडल्या, परंतु नियमित गाड्यांचे डबे वाढवले. गणेशोत्सवात रत्नागिरी-दादर पॅसेंजरमध्ये घडलेला प्रकार प्रवासी आरक्षित डब्यात बसल्यामुळे झाला. त्यावरही मार्ग काढण्यात आला.

ही पॅसेंजर मडगावला का नेण्यात येते, यावर विचारले असता ते म्हणाले की, सावंतवाडी, मडगाव येथील प्रवाशांनी गाडीची मागणी केली होती. रत्नागिरीत गाडीच्या मेंटनन्सची व्यवस्था नसल्याने ही पॅसेंजर रत्नागिरी ते मडगाव अशी चालविली जाते. मंगळूर येथे गाड्यांच्या मेंटनन्सचे सुसज्ज सेंटर सुरू केले जात आहे. त्यामुळे हीच पॅसेंजर पुढे मंगळूरपर्यंत चालविण्यात येईल.

मांडवी आणि कोकणकन्या या दोन गाड्यांचे डबे जुने झाले आहेत. ते बदलण्यात येणार आहेत. नवीन पद्धतीचे डबे बांधणीचे काम सुरू असून त्यावर लवकरच कार्यवाही होईल. अन्य गाड्यांचेही डबे बदलण्यात येणार आहेत.

-  संजय गुप्ता

अन्य गाड्यांचाही उपयोग करा

कोकणकन्याला राज्यराणी पर्याय ठरते. डबलडेकर गाडीला अल्प प्रतिसाद मिळतो. मोजक्याच गाड्यांना गर्दी असते; मात्र अन्य गाड्यांचाही प्रवाशांनी उपयोग केला पाहिजे, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी केले.

समन्वय राहावा यासाठी प्रयत्न

कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहावा यासाठी कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी थेट संवाद उपक्रम हाती घेतला आहे. गेले दोन दिवस ते रत्नागिरी विभागातील कर्मचार्‍यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. पदोन्नती, भत्ते यासह वैयक्तिक अडचणी कर्मचार्‍यांनी मांडल्या. त्यावर येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT