केरोसीन Sakal
कोकण

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शहरे केरोसीनमुक्त

६९ हजार ८९२ कुटुंबांचे जेवण चुलीवरच; ग्रामीण भागाला १९ टॅंकरद्वारे रॉकेल

राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शहरे केरोसीनमुक्त झाली आहेत. गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या कुटुंबाला केरोसीन पुरवठा बंद केला आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ४० हजार ४७३ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी ३ लाख ५३ हजार २३१ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडण्या आहेत तर ६९ हजार ८९२ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडणी नसल्याने केरोसीनसाठी पात्र आहे. म्हणजे आजही या कुटुंबामध्ये चूल पेटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ हजार लिटरच्या १९ टॅंकरद्वारे त्यांना केरोसीन पुरवठा होत आहे. पुर्वीच्या तुलनेत गॅस जोडणीमुळे सुमारे १ लाख ३१ हजार लिटर रॉकेल पुरवठा कपात झाला आहे.

जिल्ह्यात यापूर्वी ग्रामीण भागासह शहरांमध्ये चूल, स्टोव्ह, दिवा पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रॉकेल पुरवठा होत होता. मागणी मोठी असल्याने १२ हजार लिटरच्या ३१ टॅंकरद्वारे रॉकेल पुरवठा होत होता; परंतु कालांतराने गॅस सिलिंडरचा वापर वाढला. शासनाने गॅस जोडणी असलेल्या कुटुंबांचा रॉकेल पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ४० हजार ४७३ शिधापत्रिकाधारकांचा सर्व्हे करण्यात आला.

दोन गॅस असलेल्या कुटुंबाचे केरोसीन बंद करण्यात आले. शासनाने धोरण बदलत हळूहळू केरोसीन पुरवठ्यात कपात करून शहरे केरोसीनमुक्त करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा पुरवठा विभागाने फेरसर्व्हे करून गॅस जोडणी असलेल्यांचा रॉकेल पुरवठा बंद केला. जिल्ह्यातील सर्व शहरे आता केरोसीनमुक्त झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे

जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये आता गॅस जोडणी नसलेली ६९ हजार ८९२ कुटुंबे असल्याची नोंद झाली आहे. या कुटुंबांनाच १९ टॅंकरद्वारे केरोसीन पुरवठा सुरू आहे. वर्षाला सुमारे २४० टॅंकरद्वारे हा केरोसीन पुरवठा होत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये सुमारे १२ हजार लिटरचे ११ टॅंकर बंद झाले आहेत. म्हणजे १ लाख ३१ हजार लिटर रॉकेल कपात करण्यात आली आहे. ३ लाख ५३ हजार २३१ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडण्या असल्याची नोंद असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.

एक नजर

जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ४७३ शिधापत्रिकाधारक

३ लाख ५३ हजार २३१ शिधापत्रिकाधारकांकडे गॅस जोडण्या

पूर्वी दरमहा ३१ टॅंकरद्वारे होत होता रॉकेल पुरवठा

११ टॅंकर झाले कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT