खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा sakal
कोकण

रत्नागिरी : पटसंख्येअभावी बिघडले गणित.

खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र; १३२ शाळा बंदच्या मार्गावर

सिद्धेश परशेट्ये

खेड: तालुक्यातील ३३२ शाळांपैकी १३२ शाळांची पटसंख्या १० च्या आत तर ११ शाळांची पटसंख्या ७० च्या वर आहे. ही आकडेवारी पाहता जिल्हापरिषद शाळांची स्थिती समाधानकारक दिसत नाही. दिवसेंदिवस तालुक्यातील अनेक शाळा पटसंख्येअभावी ओस पडू लागल्या आहेत. सद्यस्थितीत १० च्या आतमध्ये पटसंख्या असलेल्या १३२ शाळा टप्प्याटप्प्याने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

खासगी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हापरिषद शाळांतील काही शिक्षकांनी लोकसहभागातून वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या शाळेतील पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरी शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे या सर्व घडामोडींना मर्यादा येत आहेत. मोफत शिक्षणाची स्थानिक पातळीवर सोय असूनसुद्धा भरमसाठ फी भरून खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. काही गावांत मुलेच नाहीत तर शाळेत येणार कुठून? पहिली ते सातवी पर्यंत असणाऱ्‍या या शाळांमध्ये शाळेत शिकण्यासाठी मुलेच नसल्यामुळे काही शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. शाळाच बंद असल्याने इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

राज्याच्या शिक्षण विभागाकडून गावातील प्रत्येक वाडीवस्तीवर शाळा उभारून गावातील मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे धोरण आहे. किमान शिक्षण विभागाने या गावांचे सर्वेक्षण करून खरच मुले गावात आहेत की नाहीत. जर असतील तर ती शाळेत का येऊ शकत नाहीत, याची पाहणी करणे गरजेचे आहे.

..मुलांना मागे ठेवणे, असे वाटते

गेल्या काही वर्षांत पालकांची धारणा इंग्रजी भाषा हीच आपल्या पाल्यांच्या प्रगतीची दारे उघडण्याची किल्ली, अशी झाली आहे. त्यामुळे मराठी माध्यमातून शिकणे हे विकासाच्या संधीची दारे बंद होण्यासारखे वाटू लागले आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणे म्हणजे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि मराठीतून शिकणे म्हणजे आपल्या मुलांना मागे ठेवणे अशी समीकरणे शहरातून खेडोपाड्यात निर्माण झाल्यामुळे परिणामी मराठी शाळांना घरघर लागली आहे.

  • इंग्रजी माध्यमाकडे यामुळे कल ..

  • इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हे प्रतिष्ठेचे लक्षण

  • आकर्षक रंगरंगोटी केलेल्या इमारती

  • विविध प्रकारचे खेळ आणि खेळाचे साहित्य

  • जवळपास रोजच्या रोज साजरे होणारे कार्यक्रम

त्या ७ शाळा अशा..

तालुक्यातील बोरघर-नातूनगर पूर्नवसन प्रकल्प येथील एक , सुकीवली केंद्र शाळेतील एक, तळवटपाल उपालेवाडी एक, कुळवंडी मराठी शाळा एक, खेड येथील शाळेच्या दोन, लवेल मराठी शाळेची एक तर पन्हाळजे बलदेववाडी शाळेची एक अशा ७ शाळांच्या ९ वर्ग खोल्यासाठी ६८ लाख रुपये मंजूर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT