Mandangad Nagar Panchayat Election 2022 Esakal
कोकण

मंडणगड नगरपंचायत: महाविकास आघाडीचा झेंडा; बेर्डे, कोकाटेंची वर्णी

नगरसेवकांच्या उपस्थितीत हात वर करुन निवडणुक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

मंडणगड (रत्नागिरी): मंडणगड नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat Election 2022 ) नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) ॲड.सोनल बेर्डे तर उपनगराध्यक्ष पदी वैभव कोकाटे यांची निवड झाली. निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मंडणगड नगरपंचायत कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे व मुख्याधिकारी विनोद डवले व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी नगरसेवक नगराध्यक्षचे पदाचे निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून विनोद जाधव तर महाविकास आघाडीकडून अँड. सोनल बेर्डे यांनी आर्ज दाखल केले होते.

सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हात वर करुन निवडणुक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी अँड.सोनल बेर्डे यांच्या बाजूने 9 नगरसेवकांनी हात वर करुन आपले समर्थन जाहीर केले. तर विनोद जाधव यांना 8 नगरसेवकांचे समर्थन मिळाले. एका मताचे फरकाने अँड. सोनल बेर्डे यांची निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे यांनी प्रक्रीयेचे प्रशासकीय सोपस्कर पुर्ण केल्यानंतर जाहीर केले. उपनगराध्यक्ष पदासाठी आजच आर्ज दाखल करायचे होते. त्यानुसार महाविकास आघाडीकडून वैभव कोकाटे तर शहर विकास आघाडीचेवतीने आदेश मर्चंडे यांनी आपले उमेदवारी आर्ज दाखल केले.

नगराध्यक्षांची निवडीनंतर उपनगराध्यक्षाची निवड प्रक्रियाही हात वर करुन राबवण्यात आली. यामध्ये वैभव कोकाटे यांना 9 तर आदेश मर्चंडे यांना 8 नगरसेवकांचे समर्थन मिळाले. एकामताने वैभव कोकाटे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. नगराध्यक्षपदी निवड झालेल्या अँड.सोनल बेर्डे व उप नगराध्यक्षपदी निवड झालेले वैभव कोकाटे यांचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, सायली कदम, दापोलीचे माजी सभापती राजेश गुजर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, नेहा जाधव, दीपक घोसाळकर, दिनेश सापटे, दीनेश लेंडे, राजाराम लेंढे, राकेश साळुखे व उपस्थित कार्यकर्ते, मान्यवरानी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT