कोकण

एलईडीचा वापर करून मच्छिमारी करणाऱ्या दहा नाैकांवर कारवाई

राजेश कळंबटे

रत्नागिरी - पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर तटरक्षक, पोलिस आणि मत्स्य खात्याने रत्नागिरी ते पावस दरम्यान बारा वावामध्ये विजेच्या प्रखर दिव्यांचा वापर करुन मासेमारी करणार्‍या दहा नौकांवर कारवाई केली. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला काही तास उलटत नाहीत, तोपर्यंत झालेल्या या कारवाई करण्यात आली.

प्रखर विजेचे दिव वापरुन केलेल्या मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्य साठा कमी होणार असल्याची भिती पारंपरिक मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे. हा मुद्दा राज्य व केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देण्यात आला होता; मात्र अवैधरित्या विजेच्या दिव्यांचा वापर करुन मासेमारी सुरुच होती. पर्ससिननेटद्वारे 1 जानेवारीपासून मासेमारी बंद असतानाही अनेक नौका 12 वावामध्ये आढळून येत होत्या.

मच्छीमारांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची गुरुवारी (ता. 22) नवी दिल्लीत भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर तत्काळ कारवाई करा असे आदेश प्रभू यांनी दिले. त्याची तत्काळ अंमलबजावणी तटरक्षक, पोलिस आणि मत्स्य विभागाकडून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रदिप पी यांच्या आदेशानंतर मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेतून काल सायंकाळी रत्नागिरीची किनारपट्टी पिंजून काढण्यात आली. त्यामध्ये दहा मच्छीमारी नौका विजेच्या दिव्यांचा वापर करताना आढळून आल्या. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

महंमद दर्वे (उम्मे कुलसुंब), जुमाबी दर्वे (अखलायी), दाऊदमियॉ आदम भाटकर (खतीजा सातिमा), शंकर पालशेतकर (जरीमरी तिसाई), असलम पांजरी (सुफीया आचशा), मोहिद्दीन फणसोपकर (सुलतान आजमान), शौकत डांगे (एम साहिल एम राहिल), विनायक मोरेश्‍वर (श्री विघ्नहर्ता), इस्माईल दर्वे (अमीना अजीना), खलिल मिरकर (सईद रजिन) या नौकांचा त्यात समावेश आहे. जप्त केलेल्या नौका पुढील आदेश होइपर्यत सहाय्यम मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या देखरेखेखाली एका बंदरात उभ्या करुन ठेवल्या जाणार आहेत. तशी नोटीस मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना बजाविण्यात आली आहे. तसेच दंडात्मक कारवाईसाठी तहसिलदारांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT