मुंबई ः येथील टिळक भवनात रमेश कदम यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत करताना अशोक चव्हाण, हुसैन दलवाई, भाई जगताप, माणिक जगताप, हर्षवर्धन पाटील.
मुंबई ः येथील टिळक भवनात रमेश कदम यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत करताना अशोक चव्हाण, हुसैन दलवाई, भाई जगताप, माणिक जगताप, हर्षवर्धन पाटील.  
कोकण

काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढतेय - अशोक चव्हाण

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - काँग्रेसमधील अडथळे दूर झाल्यामुळे पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रमेश कदमांना काँग्रेसमध्ये प्रवेश देताना माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना टोला हाणला. रत्नागिरी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी लागेल ते बळ देण्याचे आश्‍वासन अशोक चव्हाण यांनी रमेश कदम यांना यावेळी दिले. 

मुंबईतील टिळक भवन येथे सायंकाळी रमेश कदम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार हुसैन दलवाई, आमदार भाई जगताप, माणिक जगताप, हर्षवर्धन पाटील, जिल्हा प्रभारी विश्‍वनाथ पाटील उपस्थित होते. 

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून नवीन पक्षाची घोषणा केली. त्यानंतर आज रमेश कदम यांचा काँग्रेस प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, "" कोकणात काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते आहेत. परंतु मध्यतंरी निर्माण झालेल्या वातावरणामुळे ते शांत होते. काँग्रेसमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे कुणी पक्षात येण्यास तयार नव्हता. काँग्रेस पक्षाला समजून घेणारे कोणीतरी आम्हाला कोकणात हवा होता. काँग्रेसमधून भीती संपली आहे. अडथळेही दूर झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कार्यकर्त्यांना मोकळा श्‍वास घेता येणार आहे. रमेश कदमांसारखे चांगले नेते पक्षात येत आहेत. त्यांचा पक्षप्रवेश म्हणजे देर आये दुरुस्त आहे. विकास सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करीत आहेत. रमेश कदम रत्नागिरीत पक्ष वाढवतील. त्यामुळे भविष्यात कोकणात काँग्रेस भक्कम होईल.'' 

रमेश कदम म्हणाले की, "आज जुन्या प्रवाहात आल्याचा आनंद होत आहे. काँग्रेसमधील नेते माझे जुने सहकारी आहेत. मी पूर्वी काँग्रेसचाच कार्यकर्ता होतो. पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर मी त्या पक्षात गेलो. मध्यंतरी शेकापत गेलो. आता जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्न करेन. नजीकच्या काळात जिल्ह्यात पक्ष वाढलेला दिसेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT