कोकण

आंबा पिकविण्याविषयी अपप्रचाराचा हापूसला फटका

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - मुंबईच्या बाजारात हापूस आंब्याला चांगला दर मिळाल्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेत अद्याप आंबा विक्री सुरू केली नव्हती. मात्र मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर आंबा पिकविण्याविषयी अपप्रचार सुरू झाला. त्यामुळे आंब्याचे दरही घसरले आहेत. 

मुंबईकडे पाठविण्यात येणारा आंबा व्यापारी आता स्थानिक बाजारपेठेत विकत आहेत. स्थानिक बाजारपेठेपेक्षाही मुंबई मार्केटला चांगला दर मिळत असल्यामुळे येथील व्यापारी मुंबईला आंबा पाठवीत होते. 

एफडीएच्या धाडीनंतर आंबा पिकविण्यासाठी इथिलीनचा वापर केला जातो, तो आरोग्यास घातक असल्याचा मेसेज व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. असा हापूस आंबा खरेदी करू नका, असा अपप्रचारही सुरू झाल्याने आंब्याचे दर खाली आले. 

आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर बंद करण्यात आला. इथिलीनचा वापर होतो. ते अधिकृतपणे उपलब्ध असते. त्याच्या वापरामुळे फळांना रंग प्राप्त होतो. त्याची मात्राही ठरली आहे. त्याच्या विक्रीवर बंदी नाही. शासनाने याविषयी नक्की आंबा कसा पिकवायचा, कोणते औषध वापरावे हे स्पष्ट करावे.
-सूरज बामणे,
आंबा बागायतदार कळवंडे, चिपळूण

चांगल्या प्रतीचा आंबा 250 ते 800 रुपये डझन 
एक आठवड्यापूर्वी घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा आंबा २५० ते ८०० रुपये डझन विकला जात होता. हा दर  १५० ते ६०० रुपये झाला. दुसऱ्या क्रमांकाचा आंबा १५० ते ४०० रुपये किलो दराऐवजी १०० ते ३०० रुपये झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT