रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. सलग दोन दिवस पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पाणी भरण्यासह दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
दरड काढण्याचे काम बांधकाम विभागाकडून सुरु आहे. रत्नगिरी शहरात बाजारपेठेत गटार तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर आले आहे. नगरपालिकेची स्वच्छता उघड्यावर पडली आहे.
पावसाचा धुमाकुळ...
चिपळूण तालुक्यात मौजे कुटरे येथे महादेव धोंडकर यांचा गोठा कोसळून दोन बैल व एक वासरु जखमी,
रत्नागिरी - कापसाळ येथे रस्त्यावर वडाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प
मौजे चिपळूण- गुहागर मार्गावर चिपळूण - चवेली रात्रीची बस गोंधळे जवळ रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे अडकून पडली
रत्नागिरी तालुक्यात मौजे कुरणवाडी येथे दिपक शंकर धावडे यांच्या घरावर झाड कोसळून अंशत: नुकसान
रत्नागिरी जिल्हयात 10 जून 2018 रोजी एकूण 1155.00 मिलीमीटर म्हणजेच सरासरी 128.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी अशी (आकडे मिलीमीटर मध्ये ) मंडणगड- 53.00 , दापोली- 77.00, खेड- 58.00, गुहागर-140.00, चिपळूण-111.00, संगमेश्वर-85.00, रत्नागिरी -239.00, लांजा 187.00 आणि राजापूर तालुक्यात 205.00 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.