water supply  esakal
कोकण

रत्नागिरी : नळजोडणीवर मीटर बसविण्याचे काम ६० टक्के

जेवढे पाणी वापरणार, तेवढे बिल येणार; शहरात १०,२८८ नळजोडण्या

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सुधारित पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता जेवढा पाणी वापर तेवढे पाणी बिल ग्राहकांना येणार आहे. त्यामुळे वायफळ पाणी वापरावर आता अंकुश बसणार आहे. पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून १० हजार २८८ पाणी मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ६० टक्केच्यावर मीटर बसवून झाले आहेत. मात्र, ही मीटर चोरीला जाऊ नये म्हणजे मिळविले. अन्यथा सर्व मुसळ केरात असे म्हणायची वेळ येईल.

रत्नागिरी शहराच्या खराब झालेल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेने नागरिक हैराण होते. अनेक ठिकाणी ती जीर्ण झाली होती, तुंबली होती, फुटली होती. मात्र, पालिकेकडे जुन्या पाणी योजनेचा नकाशा नसल्याने दुरूस्तीमध्ये अडथळे निर्माण होत होते. पाणी वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे पालिकेच्या नावे नागरिक ओरड करीत होते. दरदिवशी विविध भागातील महिला पालिकेवर मोर्चा आणत होते. त्यात मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने ३० ते ४० टक्के पाणी वाया जात होते. यापूर्वीदेखील पालिकेने नळ जोडणीला मीटर बसविले होती. परंतु कालांतराने या मीटरची चोरी होऊ लागली. अनेक भंगार व्यवसायिकांनी ती चोरल्याचा दावा तेव्हा पालिकेन केला होता.

त्यामुळे पाणी वापरावर आता कोणताही बंधन नव्हते. मात्र, सुधारित पाणी योजना आता पूर्णत्वास जात असल्याने पाण्याचे योग्य वितरण व्हावे आणि वितरण होणाऱ्या पाण्याचे मोजदाद व्हावी, यासाठी पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मोफत शहरातील १० हजार २८८ नळ जोडण्यांवर मीटर बसविण्याचा निर्णय घेतला. याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता सुमारे ६० टक्के जोडण्यांवर पाणी मीटर बसविले आहेत. आयएसओ प्रमाणित मीटर असून जेवढा पाण्याचा वापर तेवढे बिल आता शहरवासीयांना भरावे लागणार आहे.

एक नजर..

  • शहराला प्रतिदिन २ दशलक्ष लिटर पुरवठा

  • गळती ३० टक्केवरून ३ ते ४ टक्क्यांवर

  • मीटर चोरी रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

  • आयएसओ प्रमाणित मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या युवासेनेकडून ओमराजे यांना संरक्षण, मध्यरात्री कार्यकर्ते थेट ओमराजे यांच्या घराबाहेर

SCROLL FOR NEXT