हापूसची दीड हजार पेट्यांची विक्री
हापूसची दीड हजार पेट्यांची विक्री sakal
कोकण

रत्नागिरी : हापूसची दीड हजार पेट्यांची विक्री

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ग्राहकांना सर्वोत्तम हापूस आंबा देण्यासाठी कोकणातील दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी एक्याम ब्रँडखाली एकत्रित येत आहेत. इनोटेरा कंपनीकडून ही पावले उचलण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात थेट बागांमध्ये जाऊन हापूस खरेदी सुरू झाली. आतापर्यंत दीड हजारहून अधिक पेट्या कंपनीने एक्याम ब्रँडद्वारे महाराष्ट्रासह विविध राज्यांत पोहोचविल्या आहेत.

इनोटेरा कंपनीकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत चाचपणी करण्यात आली होती. बागायतदारांच्या सहकारी शेतकरी सोसायटींना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय झाला. या शेतकऱ्यांकडील आंबा ‘एक्याम’द्वारे विकला जात आहे. आतापर्यंत दीड हजार पेट्यांची विक्री झाली. महाराष्ट्रातील प्रमुख मुंबई, पुणे शहरांसह दिल्ली, जयपूर, आग्रा, कोलकता या राज्यांतही हापूस पोहोचला आहे. शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्यात येत असून, यात रत्नागिरी, देवगड, पावस, वेंगुर्ला, केळशी आणि इतर भागांमधील को-ऑपरेटिव्ह सोसायटी इनोटेरासोबत भागीदारी करण्यात येत आहे. आंबे गोळा करण्यासाठी वातानुकूलित गाड्यांचा वापर केला जातो.

कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना एकत्र आणणारी ही भागीदारी ऐतिहासिक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या फळांचे शक्य तितके सर्वोत्तम मूल्य मिळविण्यात मदत करण्याच्या या वाटचालीत ब्रँडची सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

- मन्सूर काझी, सदस्य, को-ऑपरेटिव्ह सोसायटी, पावस

ग्राहकांना सर्वोत्कृष्ट उत्पादने देण्याची भारतीय शेतकऱ्यांची क्षमता इनोटेरा कंपनी करीत आहे. हापूस उत्पादकांबरोबर भागीदारी करून दर्जेदार हापूस ग्राहकांना दिला जाईल. शेतकऱ्यांच्या सहकार्याने भारतातच नव्हे, तर जगभरात उच्च दर्जाचा हापूस देणार आहोत.

- पास्कल फोएहन, इनोटेरा ग्रुप

विशेष तपशील...

फळांची हाताळणी, ती पिकविण्याचे काम ‘एफएसएसएआय’ने मंजूर केलेल्या प्रक्रियांद्वारेग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची फळे मिळावीत, यासाठी पॅकेजिंगच्या आधी प्रत्येक फळ स्कॅन केले जाणार ‘एक्याम’मध्ये प्रत्येक फळाला एक क्यूआर कोड दिला जाईल

फळ कोणत्या बागेतून आले आहे, ते ग्राहकांना क्यूआरमधून समजून घेता येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT