Drug  sakal
कोकण

रत्नागिरी : अमली पदार्थ प्रकरणी संशयितास अटक

न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील चर्च रोड येथे १४ हजार रुपयांचा ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या संशयिताला शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने शिताफीने अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आकाश ऊर्फ सलमान अशोक डांगे (वय २९, रा. साईश्वरी अपार्टमेंट, थिबापॅलेस-माळनाका, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) सव्वा अकराच्या सुमारास निदर्शनास आली. शहरात ब्राऊन शुगर या अमंली पदार्थाची विक्री होत

असल्याची कुणकुण होती. मात्र, संशयित हाती लागत नव्हते. याबाबत पोलिसांवरही आरोप करण्यात येत होते. मात्र, एक पोलिस वेशांतर करून चर्च रोड येथे गेला व संशयितावर नजर ठेवली. नियोजनानुसार शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडून १४ हजार किमतीच्या प्लास्टिकच्या पिशवीत उग्र वासाचा ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ ज्याचे वजन पिशवीसह २. ४० ग्रॅम आहे. त्यामध्ये १. ०३ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर सदृश्य असून त्याची किंमत ३५० रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस नाईक वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुखे करत आहेत. पोलिसांनी संशयितास शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता अटक केली. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Exposes : चक्क ९ लाख रुपयांचा टर्किश मध! खरातचा फेमस प्रसाद कसा बनायचा ? तपासात उघड झाले धक्कादायक सत्य

Kolhapur jotiba : जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद; पुजाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; दर्शन मात्र सुरळीत

Latest Marathi News Live Update : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मिरगावमध्ये दाखल

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

SCROLL FOR NEXT