कोकण

क्रेडिट मिळण्यासाठीच शिवसेनेचा स्टंट

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - सत्तेत शिवसेना भागीदार, उद्योगमंत्री सेनेचा असताना कंपनीने नियुक्‍त केलेली सुकथनकर समिती रत्नागिरीत येतेच कशी? मुख्यमंत्र्यांना सांगून समितीचा दौरा आधीच रद्द करता आला असता. केवळ शिवसेनेला क्रेडिट मिळावे यासाठीच हा स्टंट होता, असा आरोप ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी केला. तसेच, समितीने गाशा गुंडाळण्यासाठी स्वाभिमाननेही आवाज उठविला होता, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरीतील स्वाभिमानच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सुकथनकर समितीला कोकणातल्या दांड्याने पिटाळून लावू,अशी वल्गना करणारे शिवसेनेचे खासदार कमिटी अनधिकृत असताना बंद खोलीत समितीसोबत चर्चा करण्यासाठी का गेले. खासदार राऊतांकडील दांडे गेले कुठे, सुकथनकर समितीतील सदस्यांना खासदार राऊत आदरणीय व्यक्ती म्हणून संबोधतात, यामागे गौडबंगाल काय. सर्वसामान्यांची कसून तपासणी आणि सेनेचा ताफा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जातो कसा. ही सर्व सेनेचीच स्टंटबाजी आहे.

कमिटी अनधिकृत होती हे माहित होते, मग सेनेचे खासदार आणि आमदार बंदिस्त सभागृहात चर्चा करण्यासाठी का आले. प्रकल्प करण्यासाठी समितीने नाणारला पुन्हा येऊ नये, तसे धाडस केल्यास स्वाभिमान स्टाईलने उत्तर देऊ. प्रकल्पाच्या समर्थनासाठी कंपनीने विकत घेतलेले लोक तेथे होते. काहींना नोकऱ्या मिळणार आहेत, असे खोटे सांगून रत्नागिरीत आणले होते, असा आरोप नागरेकर यांनी केला. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सचिन माजळकर, तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, मेहताब साखरकर आदी उपस्थित होते. 

रत्नागिरी शहराध्यक्षपदी संकेत चवंडे
युवा नेते संकेत चवंडे यांची स्वाभिमानच्या रत्नागिरी शहराध्यक्षपदी निवड झाली. तसेच विकास पाटील, सल्लाउद्दीन खान जिल्हा उपाध्यक्ष आणि प्रसाद पाटील जिल्हा चिटणीसपदी नियुक्‍त केल्याचे नागरेकर यांनी सांगितले. सचिन आचरेकर यांना जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्‍ती देण्यात येणार असून अशोक वाडेकर यांना तालुकाध्यक्षपदी नियुक्‍त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT