Narayan Rane vs Vinayak Raut esakal
कोकण

Refinery Project : 'नारायण राणे यांच्यापासून आमच्या जीवाला धोका, आमचं रक्षण करा'; राऊतांनी व्यक्त केली भीती

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी रिफायनरी विरोधकांना धमकी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘रिफायनरी विरोधकांना परत जाऊ देणार नाही’, अशी गंभीर धमकी दिली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी रिफायनरी विरोधकांना धमकी दिली आहे. त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीचा पूर्वइतिहास पाहता रिफायनरीला विरोध करणारे आम्ही जनप्रतिनिधी आणि रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जीवितास धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रिफायनरीला विरोध करणाऱ्या आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे निवेदन माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी रिफायनरी (Refinery Project) विरोधकांना जी गंभीर धमकी दिली आहे याबाबत वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या बातम्या सोबत त्यांनी जोडल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला यापूर्वी नाणार येथे सुद्धा प्रचंड विरोध झाला होता तसेच बारसू येथे देखील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच मी आणि स्थानिक आमदार राजन साळवी, शिवसेना पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनीदेखील रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना पाठिंबा दिला. विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. सातत्याने रिफायनरी विरोधी आंदोलनामध्ये आम्ही सर्व सहभागी होत असतो.

मंगळवारी (ता. ९) खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘रिफायनरी विरोधकांना परत जाऊ देणार नाही’, अशी गंभीर धमकी दिली आहे. या धमकीची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT