road problems sindhudurg district
road problems sindhudurg district 
कोकण

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? वाहन चालक बेजार, कुठली ही स्थिती?

एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - बांधकाम विभागाचे कामचलाऊ धोरण आणि कोरोनामुळे मंजुर कामांमध्ये आलेले अडथळे यामुळे जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्गावर खड्‌डेच खड्डे पडले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यावर्षीही खड्ड्यातूनच प्रवास करण्याची मानसिक तयारी वाहनचालकांना करावी लागणार आहे. 

जिल्ह्यात सध्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा महामार्गाचा प्रवास पूर्णत्वाकडे आहे; परंतु या महामार्गाला अनेक राज्यमार्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतून मिळतात. यातील बहुतांशी महामार्गाची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यातील प्रमुख राज्यमार्गावर खड्डेच खड्डे पडले असून पावसाळा सुरू होऊन अजून दीडच महिना झाला आहे. निम्मा पावसाळा अजूनही बाकी आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना यावर्षी रस्त्यापेक्षा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार असल्याची स्थिती आहे. 

बांधकाम विभागाचे तकलादू आणि कामचलाऊ धोरणामुळे रस्त्यांची ही स्थिती बनली आहे. या रस्त्यांची दुरूस्ती करण्यास बांधकाम विभागाने हेळसांड केल्याने सध्याची परिस्थिती उद्भवल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यातच यावर्षी कोरोनामुळे यातील अनेक रस्ते मंजुर असूनही होऊ शकलेले नाहीत. यामध्ये कणकवली विभागातील वरवडे-पिसेकामते, जानवली-तरदंळे-भरणी, वागदे-कसवण-तळवडे, राशीवडे-ओवीळीये-कळसुली, तिरवडे तर्फे सौंदळ, खारेपाटण-गगनबावडा, उंबर्डे-फोंडा याशिवाय सांवतवाडी विभागातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे.

हे सर्व रस्ते मंजुर असून त्यासाठी सुमारे 20 कोटीहून अधिक निधी मंजुर आहे; परंतु कोरोनामुळे मार्चमध्ये लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे ही कामे होऊ शकलेली नाहीत. त्याचा मोठा परिणाम झाला आहे. यातील अनेक रस्ते वाहतुकीस अयोग्य बनले आहेत. काही राज्यमार्गाचा तर रस्त्यापेक्षा खड्ड्यांनी अधिक भाग व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. उंबर्डे-फोंडा हा राज्यमार्गाची अवस्था तर भयानक आहे. या रस्त्याने प्रवास करणेच जिकरीचे झाले आहे. 27 किलोमीटरचा या मार्गावरील फक्त तीन ते चार किलोमीटर रस्ताच सुस्थितीत आहे. 

मंजुर रस्त्यांची निविदा प्रकियाही पूर्ण झाली होती; परंतु कोरोनामुळे शसन आदेशामुळे बहुतांशी कामे थांबली; परंतु तरीही ज्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्या रस्त्यांच्या कामांना परवानगी मिळावी, अशा आशयाचे पत्र शासनाला पाठविले आहे. अजूनही त्याबाबत निर्णय झाला नाही; परंतु तोपर्यंत खड्डे जांभा दगडाने भरण्यात येतील. 
- संजय शेवाळे, कार्यकारी अभियंता, सांर्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली. 

रस्त्यांची दुरवस्था झाली असून या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्यानंतर नेमका कुठे खड्डा आहे हेच समजत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे वैभववाडी-फोंडा मार्गावरील खड्डे गणेशोत्सवापुर्वी बुजवावेत. 
- गणेश पवार, चालक, वैभववाडी 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

2024 च्या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० मधून घेणार निवृत्ती- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT