आरटीई 
कोकण

आरटीई 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; एकनाथ आंबोकर

सकाळ वृत्तसेवा

ओरोस(सिंधुदुर्ग) : खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 2021-22 मध्ये पहिलीसाठी 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्यापासून (ता.11) ते 30 जून या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) 7 एप्रिलला काढण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत निवड यादीत 193 मुलांना प्राथमिक फेरीत लॉटरी लागलेली आहे. त्यानंतर ज्या शाळांमध्ये प्रवेशासाठी जागा रिक्त असणार आहेत त्याठिकाणी प्रतिक्षा यादीतील बालकांना प्रवेश घेण्याची संधी दिली जाणार आहे.(rte-25-per-cent-students-start-online-admission-process-education-marathi-kokan-news)

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया उद्यापासून ते 30 जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेंतर्गत प्रवेशपात्र शाळांकडून निवड यादीतील आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येईल. त्यानुसार संबंधित पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेवून शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावयाचा आहे. कागदपत्रे चुकीची अथवा अपुरी असल्यास तसेच रहिवासी दाखला, पुराव्यावरून पालकांनी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना शाळेपासून चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश नाकारण्यात येईल. अशा पालकांनी तालुकास्तरावरीय समिती, शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे.

पडताळणी समितीकडून आलेले अर्ज व तक्रारींची शहानिशा करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा किंवा देऊ नये, याबाबतचा आदेश संबंधित शाळांना देण्यात येईल. त्यानुसार शाळांनी विहीत मुदतीत प्रवेशाची कार्यवाही करावयाची आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये. जे पालक कोरोना प्रादुर्भाव व लॉकडाऊन कारणांमुळे प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी जाऊ शकत नाहीत, अशा पालकांनी विहीत मुदतीत दूरध्वनी, ई-मेल अथवा व्हॉट्सअॅपद्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांमधील रिक्त असलेल्या जागांवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर सूचना पोर्टलवर देण्यात येतील. आरटीई 25 टक्के विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याबाबतची सूचना शाळांनी प्रवेशद्वारावर लावायची आहे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT