rules followed by the Society Thanks for playing the band squad from the police 
कोकण

सोसायटीने पाळले नियम ; पोलिसांकडून बँड वाजवून आभार 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : लॉकडाऊच्या काळात संचारबंदीचे आणि कोरोना विरोधातील लढ्याचे काटेकोर पालन करणार्‍या सिद्धीविनायक सोसायटीचा आगळा वेगळा सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलिस दलाने याची दखल घेऊन या सोसायटीमध्ये बँड पथकाचे सूर आणि ढोलांच्या गजरामध्ये सोसायटीतील रहिवाशांचे दलाने आभार व्यक्त केले. 

देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. जिल्ह्यातही पोलिस दल सतर्क राहून कर्तव्य बजावत आहे. या लॉकडाऊनच्या कठीण काळात सिद्धीवानायक सोसयाटीमधील रहिवाशांनी सर्व नियमांचे काटेकोर आणि उत्कृष्ट पालन केले. पोलिस प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या सर्व सुचनांचे तंतोतंत पाळल्या. अनावश्यक गर्दी टाळली, सोशल डिस्टन्स ठेवला, अन्य बाबींचेही पालन केले. सोसायटीच्या या विशेष प्रयत्नाची पोलिस दलाने दखल घेतली. 

शहातील शिवाजीननगर येथील सिद्धीविनायक हौसिंग सोसायटीमधील रहिवाशांचे पोलिस दलाकडून बुधवारी (ता. 8) सायंकाळी विशेष कौतुक झाले. पोलिसांनी बँड पथकासह सोसयटीमधील रहिवाशांचे कौतुक केले. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक गृह आयुब खान, स्थानिक गुन्हे शाखेचे शिरीष सासणे, वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल विभुते, शीघ्र कृतीदलाचे जवान आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT