Samvidhan Yatra Vaibhavwadi Republican Sena President Anandraj Ambedkar esakal
कोकण

Indian Constitution : बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदललं, तर देशाचे तुकडे होतील - आनंदराज आंबेडकर

संविधानामुळे हा देश अखंड राहिला आहे. आता हेच संविधान बदलून धार्मिक राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

आरक्षणावरून वेगवेगळ्या समाजांना लढविण्याचे काम सुरू आहे. हे थांबणे आवश्यक आहे.

वैभववाडी : विविध धर्म, जाती व त्यांच्या रुढी, परंपरा, संस्कृती असून देखील केवळ संविधानामुळे (Constitution) हा देश एकसंघ राहिला आहे. तेच संविधान बदलले, तर देशाचे तुकडे होतील, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी येथे केले.

संविधान यात्रा (Samvidhan Yatra) काल (बुधवार) वैभववाडीत आल्यानंतर येथील संभाजी चौकात त्यांची कॉर्नर सभा झाली. या सभेला रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, तालुका बौद्ध सेवा संघाचे रवींद्र पवार, बाळकृष्ण जाधव, सुभाष कांबळे, नारायण कुसुरकर, विनोद कदम, रूपेश कांबळे, भालचंद्र जाधव, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, ‘‘धर्माच्या नावावर विभागलेल्यात पाकिस्तान आणि बांगलादेश झाले; परंतु, कित्येक धर्म, जातीचे लोक आपल्या देशात गुण्यागोविंदांने नांदत आहेत. प्रत्येकांची संस्कृती वेगवेगळी आहे. परंपरा, सण, उत्सव वेगवेगळे आहेत. मात्र, संविधानामुळे हा देश अखंड राहिला आहे. आता हेच संविधान बदलून धार्मिक राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जर संविधान बदलले तर या देशाचे तुकडे होतील. त्यामुळे संविधान बचाव यात्रा काढण्यात आली आहे. जाती, धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. आरक्षणावरून वेगवेगळ्या समाजांना लढविण्याचे काम सुरू आहे. हे थांबणे आवश्यक आहे. धड आपले आणि डोके दुसऱ्यांचे असे होता कामा नये. स्वतःचे डोके वापरायला शिका.’’

मतांची चोरी करून सत्ताधारी सत्तेत

प्रदेशाध्यक्ष बाळकर म्हणाले, ‘‘मतांची चोरी करून सत्ताधारी सत्तेवर आले आहेत. आपल्याला हवे तसे मशीनद्वारे मतदान करून घेतात. हे सत्तेत आहेत, त्यांनी स्वतंत्र मिळविण्यासाठी संघर्ष केला नाही. अशांच्या हातात सत्ता गेली आहे. याच लोकांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीला विरोध केला होता. पाशवी बहुमतांच्या जोरावर संविधानाला बाधक निर्णय या देशात होऊ लागले आहेत. देशाला भांडवलशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आत्ताच सावध व्हा, जागरूक व्हा आणि वेळीच निर्णय घ्या.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT