Careful! Sawantwadi is having a big day 
कोकण

सावधान ! सावंतवाडीत भरदिवसा होतीय घरफोडी....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदूर्ग ) : शहरातील खासकीलवाडा व माजगाव परिसरातील भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच त्याच दिवशी (ता.२४) चराठा भागात आणखीन एक घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. भरदिवसा तीन घरफोड्या झाल्याने पोलिस यंत्रणेने याचा छडा लावण्यासाठी कसून तपास केला आहे. या तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे १० लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.


चराठा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याने सुमारे दहा हजारांची रोख रक्कम लंपास केली असून याबाबतची तक्रार लवू राजाराम चव्हाण (वय ५२) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चव्हाण हे सकाळी आपल्या पत्नी समवेत कामानिमित्त बाहेर गेले होते. ते काल (ता.२४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा मागील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसला. चोरट्याने मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करत कपाटाच्या लॉकरमधील सुरक्षा कप्प्यातील दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची घटना उघडकीस येताच त्यांनी रात्री उशिरा सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

चोरट्यांचा धूमाकूळ...
चोरीच्या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यात माजगाव गरड व खासकीलवाडा येथील दोन्ही घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याबाबत भक्ती भरत गवस (रा. खासकिलवाडा) व अनुष्का आनंद देसाई (रा. माजगाव-गरड) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात काल तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलग तीन घरफोड्या झाल्याने पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. या प्रकरणाच्या कसून चौकशीला सुरवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

विकी-कतरिनाच्या मुलाच्या नावाचं 'उरी' सिनेमाशी खास कनेक्शन, काय आहे नावाचा अर्थ? हा संस्कृत शब्द की दुसरं काही?

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

Simple Home Remedies: रोज रात्री जेवणानंतर पोट फुगतंय? सतत गॅसचा त्रास होतोय? आजपासून करा 'हे' सोपे उपाय

Nashik Accident : चाचडगाव टोलनाक्याजवळ भीषण दुर्घटना; ईर्टिगा-स्कॉर्पिओच्या धडकेत गुजरातच्या कुटुंबावर काळाचा घाला

SCROLL FOR NEXT