प्रियकराच्या मदतीने शिक्षकाचा खून केल्याचे उघड
प्रियकराच्या मदतीने शिक्षकाचा खून केल्याचे उघड 
कोकण

प्रियकराच्या मदतीने शिक्षकाचा खून केल्याचे उघड

अमोल टेंबकर

सावंतवाडी: आंबोली कावळेसाद येथे खून करुन टाकण्यात आलेले गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहीती आज (बुधवार) येथे पोलिस तपासात उघड झाली. अनैतिक संबंधातून हा प्रकार केल्याचे दोघांनी मान्य केले आहे.
 
खूनाच्या प्रकारानंतर गडहिंग्लज येथून फरार असलेल्या संशयित सुरेश आप्पासो चोथे (वय 32) व गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव या दोघांना रविवारी रात्री मुंबई लोअर परेल येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. दरम्यान, आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना आठ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, ता. 11 नोव्हेबरला आंबोली कावळेसाद येथील खोल दरीत एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे डोके छीन्नविछीन्न अवस्थेत दिसत होते. त्यामुळे तो नेमका कोणाचा याबाबत माहिती मिळविणे सावंतवाडी पोलिसांना अवघड बनले होते. दरम्यान, गडहिंग्लज येथील शिक्षण गुरव हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची पत्नी यांनी गडहिंग्लज येथील पोलिस ठाण्यात दिल्याची माहीती पुढे आली. त्यानुसार त्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी तेथील पोलिसांसह गुरव यांचा मुलगा आंबोली येथे आला होता, तपासणी दरम्यान त्याने मृतदेहाच्या हातात असलेल्या दोर्‍याच्या ओळखीवरुन तो मृतदेह आपल्याच वडिलांचा असल्याचे सांगितले होते. मात्र डोक्यावरुन ओळख पटविणे शक्य नसल्यामुळे डीएनए चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते.

दरम्यान, हा प्रकार घडल्याच्या चौथ्या दिवसापासून त्यांच्या घरासमोर राहणारा पत्नीचा प्रियकर हा फरारी झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय गडद झाला होता. मात्र, कोणताही ठोस पुरावा हाती नसल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. पुन्हा चौकशी दरम्यान आणखी दोन दिवसांनी खून झालेल्या गुरव यांची पत्नी घरातून बेपत्ता झाली. त्यामुळे या खुनात त्या दोघांचाच हात असल्याचे आता निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिस त्यांच्या मागावर होते.

दरम्यान, यातील संशयित याचा पोलिसांना शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे लोकेशन मुंबई, दिल्ली, गुजरात आणि कोल्हापूर असे मिळू लागले. तो एका ठीकाणी कोठे थांबत नव्हता. त्यामुळे पोलिस हैराण झाले. दरम्यान, शनिवारी रात्री त्याचे मुंबई घाटकोपर परिसरात लोकेशन दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी योग्य तो सापळा रचला आणि त्या दोघांना ताब्यात घेतले, त्यानंतर केलेल्या चौकशी दरम्यान त्यांनी आपणच अनैतिक संबंधातून आपणच हा खून केल्याचे कबूल केले आहे, अशी माहीती तपासिक अमंलदार सुनिल धनावडे यांनी सादर केली.

यावेळी संबधित प्रकार हा अनैतिक प्रकारातून घडला आहे. मात्र, गडहिंग्लज ते आंबोली हे अंतर लक्षात घेता त्या ठिकाणावरुन मृतदेह आणणे दोघांना शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा तपास करण्यासाठी तसेच दोघांनी आपण खून केल्याचे कबूल केले आहे, त्यामुळे नेमका खून कोठे केला, त्यासाठी कोणती हत्यारे वापरण्यात आली तसेच खून गडहिंग्लज मध्ये केला की आंबोलीत केला, तसेच मृतदेह दरी पर्यत आणण्यासाठी कोणती गाडी वापरली याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी श्री धनावडे यांच्यासह सरकारी वकील दलाल यांनी केली. गुन्हा घडल्यापासुन पोलिसांना बराच वेळ तपासाला मिळाला होता. संबधितांनी आपण गुन्हा मान्य केला आहे कारण सुध्दा सांगितले आहे. त्यामुळे त्यांना मोठी पोलिस कोठडी देवू नये, अशी मागणी संशयितांचे वकील परशुराम चव्हाण यांनी केली. मात्र, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे

न्यायालयाने वकील दिला...
चौकशीनंतर दोघांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधिश बुंधवंत यांनी तुमचा बचाव मांडण्यासाठी वकील आहे का? असा प्रश्‍न दोघांना विचारला. यावेळी दोघांनी नकार दिला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या परशुराम चव्हाण यांना वकीलपत्र घेण्याची सुचना न्यायाधिश बुधवंत यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT