‘सामाजिक बांधिलकी’ झाली सज्ज
‘सामाजिक बांधिलकी’ झाली सज्ज sakal
कोकण

सावंतवाडी : ‘सामाजिक बांधिलकी’ झाली सज्ज

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : पावसाळ्यात निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळून शहरवासीयांना तत्काळ सेवा देण्यासाठी रवी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक बांधिलकी आपत्ती व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यात एकूण पंधरा जणांची टीम सेवा देणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.

आपत्तीग्रस्तांना प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, संजय पेडणेकर, संतोष तळवणेकर, अरुण घाडी आदी सहकार्य करणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. साळगावकर यांनी आज संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, रवी जाधव, संदीप नाईक, संतोष तळवणेकर, अरुण घाडी, शाम लोकरे, पवन पाटील आदी उपस्थित होते.

साळगावकर पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. सर्वच ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहोचत नाही. अनेक ठिकाणी घरे-मांगरावर झाडे पडणे, पूरस्थिती अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. मोठ्या नुकसानीचा सामनाही करावा लागतो. अशातच यावर्षी आपत्कालीन परिस्थितीत आपद्ग्रस्तांना मदत देण्यासाठी ‘सामाजिक बांधिलकी’ने पुढाकार घेतला आहे. ही संकल्पना या पथकाच्या अध्यक्षस्थानी निवड झालेल्या श्री. जाधव यांनी आपल्याकडे मांडली. नंतर सहकाऱ्यांच्या मदतीने ती सत्यात आणली. या पथकात १५ हून अधिक जण कार्यरत असणार आहेत. यात अर्शद बेग, प्रदीप नाईक, लक्ष्मण कदम, नासीर पटेल, बंड्या तोरसकर, नीलेश पाटील, अरुण घाडी, बंटी माटेकर, दिलीप पवार, दीपक सावंत, मनोज घाटकर, शुभम मलकाचे, श्याम लोकरे, पवन पाटील आदींचा समावेश असेल.

..तर टीमशी संपर्क साधा

जाधव म्हणाले, ‘‘सामाजिक कार्याची आवड असल्याने आणि वेळोवेळी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्याने शहरवासीयांना ही सेवा देण्याची संकल्पना मनात आली. यावर्षी पावसाळ्यामध्ये केव्हाही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी टीमशी संपर्क साधावा. शहरासह नजीकच्या गावांमध्येही ही सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT