Chandrashekhar Bawankule  esakal
कोकण

Chandrashekhar Bawankule : ज्यांच्या नशीबात असेल त्याला उमेदवारी मिळेल

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ज्यांच्या नशीबात असेल त्याला उमेदवारी मिळेल, असे सांगत त्यांनी सावंतवाडीच्या उमेदवारीवर थेट बोलण्याचे टाळले.

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - उरले सुरले आमदार टिकले पाहीजेत म्हणून अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी वक्तव्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करत आहेत. कोण कोणाच्या संपर्कात आहेत, हे वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ज्यांच्या नशीबात असेल त्याला उमेदवारी मिळेल, असे सांगत त्यांनी सावंतवाडीच्या उमेदवारीवर थेट बोलण्याचे टाळले.

येथील विधानसभेच्या वॉर रूमचे उद्‍घाटन गुरुवारी (ता.१९) रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, मंदार कल्याणकर, शितल राऊळ, मनोज नाईक, अतुल काळसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत २२ जागांची मागणी केली आहे. लोकशाहीत कोणीही मागणी करू शकतात; पण, या सर्वाचा निर्णय भाजपचे केंद्रिय निवड मंडळ घेणार आहे. तिकिट वाटपात सर्वांना विश्वासात घेणार येणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अजित पवार गटांचे काही आमदार आमच्या संर्पकात असल्याचे वक्तव्य केले होते. ते आमदार टिकून राहिले पाहिजेत यासाठीचे ही वक्तव्ये आहेत. मात्र, वेळ आल्यानंतर सर्वकाही कळेल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ज्यांच्या नशीबात असेल त्याला उमेदवारी मिळेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT