कणकवली : प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यतेच्या निकषांमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून ज्या शाळांमध्ये १५० पेक्षा अधिक पटसंख्या असल्यास मुख्याध्यापक पद मंजूर होणार आहे. त्या पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या मुख्याध्यापक पद रद्द केले जाणार असल्याने बहुतांशी शाळांमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. मुख्याध्यापक पदही अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
केंद्राने शैक्षणिक धोरण जाहीर केल्यानंतर एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे; मात्र शिक्षण हक्क कायदा विचारात घेऊन नव्या धोरणानुसार संचमान्यतालाही निकष बदलले आहे. पाचवी ते दहावीपर्यंत ज्या शाळा आहेत, अशा शाळांमध्ये एक ते १७५ पटसंख्या असल्यास पाच शिक्षक, त्यापुढे २१० पर्यंत पटसंख्येला ६ शिक्षक, २४५ पटाला ७ शिक्षक आणि २८० पटसंख्याला ८ शिक्षक दिले जाणार आहेत. ज्या शाळांची पटसंख्या १७५ असेल तेथे ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असे प्रमाण शिक्षक पद निश्चित करताना राहील.
आठवी ते दहावी शाळांमध्ये एक ते १०५ पटसंख्येसाठी तीन शिक्षक पदे, १४५ साठी ४ शिक्षक, १८५ पटसंख्येसाठी ५ आणि २२५ पटसंख्येसाठी ६ शिक्षक पदे राहणार आहेत. या शाळांना १०५ विद्यार्थ्यांनंतर प्रति ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असे प्रमाण राहणार आहे. ज्या शाळांमध्ये आठ ते पंधरा शिक्षक पदे असतील तेथे एक क्रीडाशिक्षक आणि ज्या शाळांमध्ये ३२ ते ३९ पर्यंत शिक्षक पदे मंजूर असतील तेथे दोन क्रीडा शिक्षक दिले जातील. ज्या शाळांमध्ये १६ ते २३ शिक्षक पदे मंजूर आहेत. तेथे एक कलाशिक्षक आणि ४० ते ४७ शिक्षक पदे असलेल्या शाळांमध्ये दोन कला शिक्षक दिले जातील.
...तर अतिरिक्तता ठरविता येणार नाही
कार्यानुभव शिक्षकांसाठीही २४ ते ३१ शिक्षक पद असलेल्या शाळांना एक कार्यानुभव शिक्षक आणि ४८ ते ५५ शिक्षक मंजूर शाळांना दोन कार्यानुभव शिक्षक दिले जाणार आहेत; मात्र एखाद्या शाळेत विशेष शिक्षकांची पदे मंजूर होत आहेत व तेवढेच कार्यरत असतील आणि शिक्षक अतिरिक्त होत असतील तर विशेष शिक्षक अतिरिक्त ठरविता येणार नाहीत.
शासनाचे निकष असे...
सध्यातरी विशेष शिक्षक पदे असलेले शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका कमी आहे. मुख्याध्यापक पद मंजूर करण्यासाठी पहिली ते पाचवीचा वर्ग असलेल्या शाळांच्या पटसंख्येसाठी २०० विद्यार्थ्यांनंतर ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक तसेच सहावी ते आठवीसाठी १०५ विद्यार्थी पटसंख्या असल्यास ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असा निकष निश्चित आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.