ST Bus
ST Bus esakal
कोकण

जिल्ह्यात एसटीचे सात आगार सुरू

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा विसावा दिवस होता. परंतु, आता हळूहळू कर्मचारी कामावर हजर होऊ लागल्याने जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी आगार वगळता अन्य सातही आगारातून वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. यामुळे जिल्ह्यात आज ७३ फेऱ्या सोडण्यात आल्या. गावात लालपरी पोचल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. पुढील दोन दिवसांत आंदोलन मिटून वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

एसटी विभागातील ३८० कर्मचारी आज कामावर रुजू झाले. यामध्ये चालक, वाहकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उद्या-परवापासून एसटी हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. लांजा, गुहागर, दापोली, चिपळूण आदी आगारांतून आज गाड्या सोडण्यात आल्या. देवरूख आगारात काही कर्मचाऱ्यांमध्ये कामावर हजर होण्याबाबत मतप्रवाह पाहायला मिळाले. परंतु काल अनेक कर्मचारी देवरूखमध्ये हजर झाले होते आणि वाहतूकही सुरू झाली होती. पण आज देवरूख आगारातून एकही गाडी सुटली नाही.

रत्नागिरी विभागात आज ३० कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आले. तसेच ६६ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली. त्यामुळे आता आजअखेर निलंबित कर्मचारी संख्या १४८ आणि सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या : १८३ झाली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना आवाहन केल्यानुसार काही कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द होऊ शकते. परंतु त्याचा निर्णय काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, कोल्हापूर, सातारा, सांगली, येथील बहुतांशी आगार चालू झाल्यामुळे रत्नागिरीत नोकरी करणारे एसटी कर्मचारी पुन्हा रत्नागिरीत कामावर हजर होण्याची शक्यता आहे. यामुळे रविवार, सोमवारपासून अधिक कर्मचारी कामावर हजर होतील आणि एसटी फेऱ्या सोडण्यात येतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरीतील आंदोलन सुरूच

रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एसटी विभागीय कार्यालयाबाहेर अजूनही कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ते ठाम असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ कर्मचारी आता कामावर हजर होऊ लागले आहेत. त्यामुळे आंदोलन चालू ठेवण्याबाबतही मतप्रवाह कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले. दोन दिवसांत हे कर्मचारी हजर होतील आणि गाड्या सुटतील, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT