कोकण

शाहनवाज शाह यांची जलदूत म्हणून निवड 

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - येथील सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांची जलसंपदा विभागाने जलदूत म्हणून नियुक्ती केली आहे. जलसंधारणाच्या कामात शाह यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. ते 15 वर्षे जलसंधणारणाच्या कामात सक्रिय आहेत. 

चिपळूण शहरातील नाले, वहाळ पालिकेने ताब्यात घेऊन मिनी केरळ उभारता येईल ही संकल्पना त्यांनी मांडली. त्यासाठी उपोषण करून पालिकेकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवला. कापसाळ धरण व वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी त्यांनी उपोषण केले.

2009 मध्ये भुयारी गटार योजनेच्या विरोधात यशस्वी लढा दिला. ग्लोबल टुरिझम संस्थेच्या माध्यमातून दोन वर्ष रामतीर्थ तलावातील गाळ उपसा करून घेतला. विविध संस्थांच्या मदतीने बुजलेल्या नारायण तलावतील गाळ काढून सुशोभिकरणासाठी प्रयत्न केले. पालकमंत्री वायकर यांच्या मदतीने 4 कोटी 33 लाखाचा निधी उपलब्ध करून घेतला.

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी खासदार हुसैन दलवाई, पालकमंत्री वायकर यांच्या मदतीने 10 कोटीचा निधी मंजूर करून घेतला. गाणे खडपोली परिसरात कृषी विभागाच्या सहकार्याने जलसिंचन बंधारे बांधण्याचे काम त्यांनी केले आहे. वाशिष्ठी नदीत बंधारे बांधून पाणी अडविणे व साचलेले पाणी प्रवाहीत करण्यासाठी शाह यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी गार्डनसाठी वापरणे, मैल्यापासून खतनिर्मिती करणे या विषयावर अभ्यास सुरू आहे. तिवरे धरण ते खडपोली व पोफळी ते गोवळकोट नदीचा भौगोलिक, जैवविविधतेचा स्वखर्चाने अभ्यास करीत आहे. गोवळकोट ते बहादूरशेख नाका परिसरातील वाशिष्ठी नदीलगतचा भाग पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावा यासाठी प्रयत्न आहेत. 
- शाहनवाझ शाह 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT