shekap
shekap 
कोकण

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत शेकापचे सरपंच व अन्य सदस्यांची बिनविरोध निवड

अमित गवळे

पाली- सुधागड तालुक्यातीतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका रविवारी (ता.२७) होणार आहेत. दरम्यान तालुक्यातील नांदगाव व गोमाशी या दोन ग्रामपंचायतीवर बुधवारी (ता.23) शेकापचे सरपंच व अन्य सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच पाली ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तालुक्यातील १४ पैकी ११ ग्रामपंचायतींचीच निवडणुक रविवारी (ता.२७) पार पडणार आहे.

नांदगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सोनल संजिव ठकोरे तर गोमाशी ग्रामपंचायत सरपंचपदी पुजा प्रविण पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शे.का.पक्षाच्या वतीने पक्षाच्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतांना सुधागड तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शे.का.पक्षाची सत्ता प्रस्थापित होणार असल्याचा दावा शेकाप नेते सुरेश खैरे यांनी केला होता.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
नांदगाव ग्रामपंचायत सोनल संजिव ठकोरे (सर्वसाधार स्त्री) या सरपंचपदी, संजना संजय वाघमारे (अनु- जमाती स्त्री), अरविंद काशीराम फणसे(सर्वसाधारण), वैशाली दिनेश दिघे(सर्वसाधारण स्त्री), तसेच गणपत एकनाथ भणगे(सर्वसाधारण), सरिता भिखुनाथ म्हसकर (सर्वसाधारण स्त्री), प्राची परेश खामकर (ना.मा.प्र) हे बिनविरोध निवडून आले आहेत.

गोमाशी ग्रामपंचायत
सरपंचपदी पुजा प्रविण पवार (अनुसुचीत जाती) या सरपंचपदी, तसेच भुषण भास्कर सुतार, नंदीनी ज्ञानेश्वर जाधव, पल्लवी हरिदास गायकवाड, दिपाली जितेंद्र खैरे,संजय वसंत भालेराव, शर्वरी चंद्रशेखर जंगम, शरद राजाराम उतेकर आदी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT