Mansi Dalvi, wife of MLA Mahendra Dalvi, engages in a heated exchange with education officers at RCF School in Alibag. esakal
कोकण

शिंदे गटाच्या आमदार पत्नीची शाळेत दबंगगिरी, गटशिक्षण अधिकाऱ्यावर उचलला हात

शिवसेना (शिंदे गट) स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी याप्रसंगी पालकांच्या वतीने शाळेत उपस्थित होत्या. यावेळी मानसी दळवी यांनी कंपनीचे प्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी यांना धारेवर धरीत शाळा बंद करण्यात येवू नये अशी मागणी केली.

महेंद्र दुसार

मानसी दळवी यांनी पालकांची भूमिका जोरदारपणे उचलून धरीत शाळा बंद करण्यात येऊ नये असा इशारा कंपनी व्यवस्थापन तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिला. यावेळी मानसी दळवी यांच्या रोषाला शिक्षण विभागातील तीन अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. दळवी यांनी थेट या अधिकाऱ्यांवर हात उचलीत शाळा वाचविण्यासाठी आपली दबंगगिरी दाखवून दिली. यानंतर लवकरच कंपनी प्रतिनिधी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी, पालक यांची एकत्रित बैठक घेवून सकारात्मक मार्ग काढण्याचे ठरल्यानंतर पालक शाळेतून माघारी परतले.

आर.सी.एफ. कंपनीतर्फे अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथे शाळा उभारण्यात आली आहे. या शाळेचे व्यवस्थापन पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेकडे आहे. मागील काही दिवसांपासून शाळा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे संस्था शाळा चालविण्यास इच्छुक नसून याबाबत संस्थेने यापूर्वीच आर.सी.एफ. कंपनी व्यवस्थापन सोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र शाळा सुरू रहावी यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा व्यवस्थापन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना केल्या. यानुसार शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी शाळेतील समायोजन जवळच्या शाळांमध्ये करता येणे शक्य आहे असा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे २३ सप्टेंबर २०२४ सादर केला आहे.

सदर अहवालाचा दाखल शिक्षण उपसंचालक यांनी उच्च न्यायालयातील शासकीय अभियोक्ता यांना देत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या १० वी व १२वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध आहे, असा पत्रव्यवहार २४ सप्टेंबर केला आहे. यामुळे ही शाळा बंद होणार व आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचे काय होणार असा प्रश्न पालकांपुढे उभा ठाकला आहे.

गुरुवारी (ता.२६) पालक मोठ्या संख्येने शाळेत जमा झाले. त्यांनी मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. यांनतर आर.सी.एफ. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी शाळेत दाखल झाले. यावेळी पालकांनी कंपनीचे प्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी यांना धारेवर धरले व शाळा बंद करण्यात येवू नये अशी मागणी लावून धरली.

आमदार पत्नीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चोप

शिवसेना (शिंदे गट) स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी याप्रसंगी पालकांच्या वतीने शाळेत उपस्थित होत्या. यावेळी मानसी दळवी यांनी कंपनीचे प्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी यांना धारेवर धरीत शाळा बंद करण्यात येवू नये अशी मागणी केली. यावेळी पालक कंपनी व्यवस्थापन तसेच शिक्षण विभागातील अधिकारी यांविरोधात आक्रमक झाले होते. चर्चा सुरू असताना मानसी दळवी यांचाही राग अनावर झाला व त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी अशोक कुकलारे, अलिबाग गट शिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा व आणखी एका अधिकाऱ्याला चोप दिला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेने किमान २ वर्ष शाळा चालवावी अशी विनंती कोर्टात कंपनीने केली आहे. कंपनीने शाळा चालविण्यासाठी संस्था नेमली आहे. मुलांना शिक्षण मिळावे ही भावना कंपनीची आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळा चालविण्यास तयास नसल्यास वेळप्रसंगी दुसरी संस्था निवडून शाळा सुरू ठेवण्याचा प्रयत्न कंपनी करेल.

: संतोष वझे, जनसंपर्क अधिकारी, आर. सी.एफ. कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT