Shivaji Maharaj
Shivaji Maharaj 
कोकण

रायगडावर वसुबारस तिथीला शिवचैतन्य सोहळा 

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ - रायगडावर 24 ला वसुबारस तिथीला रात्री शिवचैतन्य सोहळा आयोजित केला आहे, अशी माहिती श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी माहिती दिली आहे. यानिमित्त 23 ते 25 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

श्री. पवार म्हणाले,"" गेली सात वर्ष श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडच्यावतीने किल्ले रायगडावर दिवाळीच्या वसुबारसेच्या रात्री शिवचैतन्य सोहळा आयोजित करते. संपूर्ण रायगड दिव्यांच्या व मशालींच्या उजेडाने उजळून टाकण्यात येतो. वसुबारस या तिथीला 24 ला रात्री शिवचैतन्य सोहळा आयोजित केला आहे.

शिवचैतन्य सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेकास जितकी वर्ष झाली, तितक्‍या मशाली गडावर लावून रायगड मशालींच्या प्रकाशात उजळवून श्री शिवछत्रपतींना मानवंदना देणे. पहिली पणती देवी शिरकाईला, पहिला दिवा श्री जगदिश्वराला, राजांच्या सिंहासनाला, पहिला आकाश कंदील महादरवाजाला, नगारखान्याला लावूनच समितीचे मावळे आपल्या घरी दिवाळी साजरी करतात. शिवभक्तांनी या दीपोत्सवात सहभागी होऊन या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या भोजनाची व्यवस्था समितीमार्फत नि:शुल्क करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी पंकज भोसले, किरण शिंदे, अली महमद, अतिश कुशवाहा, रंजन गावडे याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. 

कार्यक्रमाची रुपरेषा.... 
23 ला रात्री मुंबई व महाराष्ट्रातून किल्ले रायगडाकडे प्रस्थान, 24 ला सकाळी 9 वाजता गडस्वच्छता मोहीम, दुपारी एक वाजता स्नेहभोजन, दुपारी तीन वाजता गडसजावट, रांगोळी रेखाटण, रात्री 8 वाजता स्नेहभोजन, रात्री 9 वाजता ढोलताशांच्या गजरात पालखीचे राजदरबाराकडे प्रस्थान, रात्री 10 वाजता श्री शिरकाई पूजा, आरती, रात्री 10:30 वाजता शिवचैतन्य सोहळा व नंतर सांस्कृतिक कार्यक्रम. 25 ला पहाटे 5 वाजता श्री जगदीश्वर, श्री व्याडेश्वर पूजन, सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, फराळ वाटप होणार आहे. दुपारी गडउतरून परतीचा प्रवास होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT