
India Women Cricket Team
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया दुखापतीमुळे महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतून बाहेर झाली आहे.
तिच्या बदली खेळाडूचीही घोषणा करण्यात आली आहे.
भारत आणि श्रीलंका येथे यावर्षी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा खेळली जाणार आहे. ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाछी भारतीय महिला संघाची घोषणा गेल्या महिन्यात झाली. गेल्या महिन्यात वर्ल्ड कपसोबतच त्याआधी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय संघाची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून आणि महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतून बाहेर झाली आहे. तिची यापूर्वी भारतीय संघात निवड झाली होती.
मात्र २४ वर्षीय यास्तिकाच्या डाव्या गुडघ्याला विशाखापट्टणम येथे सराव शिबिरादरम्यान दुखापत झाली आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. तिच्यावर बीसीसीआयची मेडिकल टीम उपचार करत आहे.