shiv jayanti 2022 making Chhatrapati Shivaji Maharaj statue sakal
कोकण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शंभरहून अधिक पुतळ्यांची निर्मिती

शिल्पकार संदीप ताम्हणकरांचे कौतुक; गुजरात, कर्नाटक, राजस्थानमध्येही पुतळे उभारणी

मुझफ्फर खान

चिपळूण : अंगभूत कलेच्या जोरावर मूर्ती आणि पुतळे बनवणाऱ्या शिरगाव (ता. चिपळूण) येथील संदीप ताम्हणकर यांनी शिवाजी महाराजांचे शंभरहून अधिक पुतळे बनवले आहेत. हा पुतळा बनवताना प्रत्येकवेळी त्यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो, असे शिल्पकार संदीप ताम्हणकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

शिल्पकार ताम्हणकर यांचा शिरगाव (ता. चिपळूण) येथे कारखाना आहे. त्याच्याकडे ९ इंच उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मागणी असते. महिन्याला दहा ते पंधरा या दरम्यान ते पुतळे बनवतात. ६ फूट उंचीचे शंभरहून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. ९ इंचाचा पुतळा १२०० रुपयापर्यंत तर ६ फुटांचा पुतळा ७० हजार रुपयापर्यंत विकला जातो. त्याच्या कारखान्यात हंगामात ८ ते १० कामगार मदतीला असतात.

संदीपला शिल्पकलेचा वारसा वडिलोपार्जित मिळाला आहे. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेतून २००७ मध्ये शिल्पकलेचे शिक्षण घेऊन संदीप बाहेर पडला. कोल्हापूर येथे हर्षल कुंभार, संजीव सकपाळ यांच्याकडे सराव करताना त्याने मेटल कास्टिंगमध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांची उत्तम प्रतिकृती साकारली. त्यानंतर स्वतः बनवलेल्या पुतळ्यांचे जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी प्रदर्शनही भरवले. विविध राज्यात जाऊन त्याने कास्टिंग मेटलमध्ये केलेल्या कामाला लोकप्रियता मिळाली.

त्याने गुजरात, कर्नाटक, राजस्थान येथे जाऊन पूर्णाकृती पुतळ्याचे काम केले आहे. शिवाजी महाराज यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, परशुराम यांचे पुतळे बनवले आहेत. प्राणीसंग्रहालयांसाठी लागणारे विविध प्राण्यांचे पुतळे त्याने बनवले आहेत. कोकण कृषी विद्यापीठ, एमआयटी पुणे यांच्यासह राज्यातील विविध शिक्षणसंस्था, वाचनालय आणि खासगी संस्थांकडून विविध प्रकारच्या पुतळ्यांसाठी त्याच्याकडे मागणी येते.

बाबासाहेब पुरंदरेंची घेतली आठ वेळा भेट

संदीपने पुरंदरे यांची ८ वेळा त्याने भेट घेतली. शिवाजी महाराजांचे कपडे कसे होते, त्यांचे मावळे, पगड्या, तलवार आणि इतर माहिती जाणून घेतली. पुरंदरे यांनी ५० प्रकारे पगड्या बांधून दाखवले. शिल्प बनवताना प्रमाणबद्धता महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीचा पुतळा साकारायचा असेल तर व्यक्तीची वैशिष्ट्ये, पैलूंचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळेच मी शिवाजी महाराजांची पूर्ण माहिती बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून जाणून घेतली.

दापोलीतील शिवसृष्टीचे काम सुरू

दापोली येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचे काम संदीपच्या माध्यमातून होत आहे. २० पैकी १५ प्रसंग त्याने तयार केले आहेत. शिल्पकार, मार्गदर्शक आणि परीक्षकाच्या भूमिकेत तो सध्या कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, यंदा प्रथमच पर्यवेक्षकांची सरमिसळ

SCROLL FOR NEXT