ShivSena MLA Bhaskar Jadhav Ramesh Kadam Maratha Kranti Morcha
ShivSena MLA Bhaskar Jadhav Ramesh Kadam Maratha Kranti Morcha esakal
कोकण

Konkan Politics : कट्टर विरोधक आले आमनेसामने; भास्कर जाधवांनी रमेश कदमांना मारली कडकडून मिठी; कदम म्हणाले, 'माझ्यावर त्यांचं जुनंच..'

मुझफ्फर खान

जाधव-कदम एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाली; परंतु त्याला अद्याप तरी मृतस्वरूप आलेले नाही.

चिपळूण : मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार रमेश कदम यांना कडकडून मिठी मारली. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले आमदार जाधव यांनी कदमांना मिठी मारल्यानंतर भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचे माझ्यावर जुने प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी दिली.

आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. कदम यांची राजकीय इनिंग काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाली तर जाधव यांनी शिवसेनेसारख्या जहाल विचारसरणीच्या पक्षातून राजकीय सुरवात केली.

कदम चिपळूण शहरातून तर जाधव ग्रामीण भागातून नेतृत्व करत पुढे आले; पण सुरवातीपासूनच दोघांचे जमेनासे झाले. पुढे राजकारणात एकेक पायरी चढताना दोन्ही नेत्यांमधील तेढ अधिक वाढत गेली आणि एकमेकांचे राजकीय वैरीदेखील बनले. पुढे जाधव राष्ट्रवादीत सामील झाले. त्या वेळी दोघांची दिलजमाई झाली; परंतु ती फार काळ टिकली नाही.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या नेत्यांचे समर्थकदेखील काहीवेळा एकमेकांना भिडले. त्यामुळे जाधव-कदम राजकीय वैर टोकाला पोहचले आणि गेले कित्येक वर्ष ते कायमही राहिले. जाधव आणि कदम हे चिपळूणच्या राजकारणाची दोन टोके बनली. त्यामुळे एकत्र येण्याची शक्यता पूर्ण मावळली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अमलात आल्यानंतर स्थानिक पातळीवरदेखील आघाडीची शक्यता वाढली. तसेच आमदार शेखर निकम यांनी अजित पवार यांची साथ दिली तर रमेश कदम शरद पवार यांच्याबरोबर राहिले. त्यामुळे जाधव-कदम एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाली; परंतु त्याला अद्याप तरी मृतस्वरूप आलेले नाही; मात्र सोमवारी चिपळुणात निघालेल्या मराठा मोर्चाने मात्र एकीचे शुभसंकेत दिले, अशी चर्चा सुरू झाली आहे.

चिपळूणमधील मोर्चात मराठा समाजाचे नेते, राजकीय नेतेदेखील सामील झाले होते. आमदार जाधव आणि माजी आमदार कदम यांचा सहभागदेखील अग्रभागी होता. आमदार निकम यांच्या गळ्यात हात टाकून जाधव यांनी घोषणा दिल्या तर दुसऱ्याच बाजूला उभे असलेले कदम यांना चक्क गळामिठी मारून एक मराठा-लाख मराठा अशी जोरदार घोषणा दिली.

रमेश कदमांच्या खांद्यावर हात ठेवा, अशी पत्रकारांनी सूचना केल्यानंतर भास्कर जाधवांनी मला मिठी मारली. त्यांचे माझ्यावर जुने प्रेम आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्ही दोघेही आता आघाडीत आहोत.

- रमेश कदम, माजी आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT