ShivSena MLA Rajan Salvi esakal
कोकण

Rajan Salvi : 'मला अटक झाली तरी चालेल, पण पुन्हा ACB च्या चौकशीला जाणार नाही'; आमदार राजन साळवी संतापले

आमदार राजन साळवी यांची काल रायगड एसीबी (Raigad ACB) कार्यालयात पुन्हा चौकशी झाली.

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंत मी त्यांना सहकार्य केले. पण माझ्या आईवर झालेल्या उपचाराचा खर्च देखील एसीबीने मागितला. माझ्या संपूर्ण खासगी आयुष्यातील घटना मला विचारल्या गेल्या, हे सर्व काय चालले आहे.

रत्नागिरी : आता मला अटक झाली तरी चालेल, पण मी यापुढे एसीबी रायगड कार्यालयाचे पाऊल चढणार नाही. यापुढे एसीबीला (ACB) कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) उपनेते, आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी दिली आहे.

काल सहाव्यांदा झालेल्या चौकशीनंतर आज रत्नागिरीत आल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार राजन साळवी यांची काल रायगड एसीबी (Raigad ACB) कार्यालयात पुन्हा चौकशी झाली. त्यांचे कुटुंब चौकशीसाठी हजर होते. वारंवार चौकशीच्या मध्यमातून मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

साळवी म्हणाले, गेली दीड वर्षे माझ्या संपत्तीची चौकशी रायगड एसीबीकडून सुरू आहे. आतापर्यंत सहावेळा मी एसीबी कार्यालयात जाऊन आलो. अनेक प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली आहेत. माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबाचीदेखील चौकशी करण्यात आली आहे. माझ्या गाड्या किती किलोमीटर फिरल्या, डिझेल खर्च याची माहिती देखील मागितली. तसेच विकासकामांच्या ठेकेदारांना नोटीसा देखील काढण्यात आल्या.

आतापर्यंत मी त्यांना सहकार्य केले. पण माझ्या आईवर झालेल्या उपचाराचा खर्च देखील एसीबीने मागितला. माझ्या संपूर्ण खासगी आयुष्यातील घटना मला विचारल्या गेल्या, हे सर्व काय चालले आहे. काल मी त्यांना उद्विग्नपणे सांगून टाकले, मी तुमच्याकडे सहा वेळा आलो, हे शेवटचं. यापुढे तुम्ही मला नोटीस पाठवा, गुन्हा दाखल करा पण मी अलिबागच्या एसीबी कार्यालयाचे पाऊल चढणार नाही.

उद्धव ठाकरेंचा साळवींना फोन

आज एसीबीला इशारा देऊन आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला. मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत आमदार राजन साळवी यांना धीर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT