कोकण

सिंधुदुर्गातील निर्बंध होणार शिथिल; हे राहणार सुरु, हे बंद

भूषण आरोसकर

ओरोस : राज्य शासनाने निश्चित केलेल्या धोराणानुसार सिंधूदुर्ग जिल्ह्याचा (sindhudurg district) कोरोना बाधित (covid-19 rate) दर १० पेक्षा कमी तर बेड व्यापने टक्केवारी ६० च्या खाली आला आहे. २१ जून पासून जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा (emergency services) दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत तर अन्य सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत (uaday samant) यानी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पुढील आठ ते दहा दिवसांत आपण दुसऱ्या टप्प्यात समावेश करु, असा आशावाद निर्माण केला.

ऑनलाईन पद्धतीने मंत्री सामंत यानी सायंकाळी पत्रकार परिषेद घेतली. यावेळी कोरोनाच्या दृष्टीने सिंधूदुर्ग जिल्हा सकारात्मक दृष्टीने वाटचाल करीत असल्याचे सांगत राज्य शासनाने नुकत्याच जाहिर केलेल्या साप्ताहिक रिपोर्टमध्ये जिल्ह्याचा बाधित रेट ९.६ तर रुग्णानी बेड व्यापण्याचा दर ५५.२० टक्के आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार आपण २१ जून रोजी चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात समावेश करीत आहोत. यामुळे निर्बंधामध्ये थोडी शिथिलता मिळणार आहे; मात्र ही शिथिलता कोणाच्या धमकीला घाबरून नाही तर शासन निर्णयानुसार मिळणार आहे. शिथिलता मिळत असलीतरी सोशल डिस्टेन्स, मास्क वापर व सॅंनिटायझर वापर नियमित करा, असेही आवाहन त्यांनी केले.

भाजपा तिन्ही विधानसभा मतदार संघात कोविड सेंटर उभे करीत आहे. याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष राजन तेली यानी केलेली असताना त्याला मान्यता मिळत नाही, याकडे लक्ष वेधले असता मंत्री सामंत यानी तेली यानी दिलेले पत्र मला माहित नाही. खाजगी स्वरुपात कोविड सेंटर उभे केल्यास आमची काहीच हरकत नाही. त्यात आडकाठी आणण्याचा प्रश्नच नाही, असे सांगितले. २१ जूनला जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्ह्यात येत आहेत. यावेळी आपण सुद्धा त्यांच्या समवेत असणार आहोत. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बाबत उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री सामंत यानी सांगितले.

काय सूरू राहणार?

  • अत्यावश्यक सेवा चार वाजेपर्यंत

  • अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार चार पर्यंत

  • रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने, त्यानंतर पार्सल सेवा

  • मैदाने सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ५ ते ९

  • खासगी आस्थापने ५० टक्के क्षमतेने चार पर्यंत

  • शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने

  • आरोग्य, मॉन्सून सेवा कार्यालये १०० क्षमतेने

  • चित्रीकरण ४ वाजेपर्यंत

  • धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम

  • विवाह कार्यक्रमांना ५० उपस्थिती

  • अंत्यसंस्काराला २० लोकांची उपस्थिती

  • राजकीय बैठका, मिरवणुका ५० टक्के क्षमता

  • कृषी, ई कॉमर्स सुरू

कशावर निर्बंध

  • बांधकाम साईडवरुन ४ नंतर हालचाल नाही

  • जमाव बंदी, संचारबंदी कायम

  • ५ लोकांना एकत्र येण्यास मज्जाव

  • व्यायामशाळा परवानगीने सुरू करता येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT