Sindhudurg District Bank "Banco Blue Ribbon" award
Sindhudurg District Bank "Banco Blue Ribbon" award 
कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेस "बॅंको ब्ल्यू रिबन'

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस "बॅंको ब्ल्यू रिबन 2020' पुरस्कार जाहीर झाला आहे. सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार जिल्हा बॅंकेला मिळणार आहे, अशी माहिती बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यानी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक आर टी मर्गज, व्हीक्‍टर डांटस, नीता राणे, प्रकाश गवस, दिगंबर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सावंत म्हणाले, ""अविज पब्लिकेशन, कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणून 1999 पासून कामकाज करीत आहे. या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या संस्थांची कामकाज पध्दती, सहकार क्षेत्रातील कायदे व त्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल, आधुनिक तंत्रज्ञान याबाबतची अद्यावत माहिती संकलन व प्रसिध्दीचे काम पाहते. संस्थेमार्फत 

प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या बॅंकिंग कामकाज करणाऱ्या संस्थांसाठी पुरस्कार प्रदान केले जातात. बॅंकेने आर्थिक मापदंडाचे उत्कृष्टरित्या पालन केल्याने त्याचप्रमाणे स्वमालकीचे डाटा सेंटर उभारुन सीबीएस प्रणालीद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्राहकांना बॅंकींग क्षेत्रातील विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेला देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या गटातून "बॅंको ब्ल्यू रिबन 2020' पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा मार्च 2021 मध्ये होणार आहे.'' 

सलग चार वर्षे पुरस्कार मिळाल्याबद्दल बोलताना बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी समाधान व्यक्त केले. बॅंक संचालक, अधिकारी-कर्मचारी, सभासद, ग्राहक व सभासद संस्था यांना या पुरस्कारांचे श्रेय दिले. भविष्यात जिल्हा बॅंकेकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध प्रकारच्या सेवा-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देऊन बॅंकेच्या आपली माणसं आपली बॅंक या ब्रिदवाक्‍याप्रमाणे बॅंकेचे कामकाज यापुढेही चालू राहील अशी ग्वाही दिली आहे. 

निवडणूक आल्याने राजकीय आरोप 
जिल्हा बॅंकेची निवडणूक जवळ आल्याने संचालक नसलेले राजकीय विरोधक जिल्हा बॅंक राजकीय अड्डा असल्याचा आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात येथे कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीचे कर्ज रोखले जात नाही. बॅंक व्यवस्थापक यांना आम्ही 15 लाख रूपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक होईपर्यंत असेच आरोप होत राहणार आहेत. ही निवडणूक झाली की आरोप बंद होतील. होणारी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत, असे यावेळी सांगताना सावंत यानी वर्षभर पूर्वीपासून आम्ही निवडणूक तयारी सुरु केली असल्याचे सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT