sindhudurg district page sindhudurg news
sindhudurg district page sindhudurg news  
कोकण

कोकणातील स्मार्टपेजला परदेशातूनही मागणी 

सकाळ वृत्तसेवा

खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालयाने तयार केलेल्या स्मार्ट पेजवर परदेशातून पसंतीची मोहर उमटली असून, या स्मार्टपेजची कल्पना परदेशातील संस्थेत वापरण्याची परवानगी मागितली आहे. 

लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या ग्रंथालयाबाबतची माहिती, पुस्तकांबद्दलची माहिती मिळावी, यासाठी सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आय. सी. एस. महाविद्यालय, खेड ग्रंथालय विभागाकडून आकर्षक अशा स्मार्ट पेजची निर्मिती केली आहे. ग्रंथालयाची वेबसाइट, वेबपेज, न्यूज रिपॉझिटरी, फोटो गॅलरी, नोटीस, यू ट्यूब चॅनेल, मोबाईल ऍप, लायब्ररीयन ब्लॉग अशा अनेक बाबी एकाच पेजवर उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रंथालयाबाबतची सर्व माहिती येथे उपलब्ध आहेच, शिवाय वाचकांसाठी ऑनलाइन पब्लिक ऍक्‍सेस कॅटलॉगही देण्यात आले आहेत. 

हे स्मार्टपेज मोबाइलवर विद्यार्थ्यांना अगदी सहजरित्या वापरता येण्याजोगे व आकर्षक आणि कल्पक असे बनवले गेले आहे. या स्मार्टपेजची कल्पना आवडल्याने दक्षिण आफ्रिकेतील एस. आय. एम. टी. ऍक्रा, घाना या संस्थेने सहजीवन शिक्षणसंस्थेकडे रीतसर या स्मार्टपेजची कल्पना आपल्या संस्थेत वापरण्याची परवानगी मागितली आहे. संस्थेचे रजिस्ट्रार जोसेफ डंकी यांनी हे पत्र पाठवले असून याच मागणीपत्रात हे स्मार्ट पेज बनवणाऱ्या ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांचे अभिनंदनही केले आहे. 
लवकरच सहजीवन शिक्षणसंस्थेकडून अशा प्रकारचे स्मार्टपेज वापरण्यासाठी परवानगी देणारे पत्र एस. आय. एम. टी. घाना या संस्थेस दिले जाणार आहे. तसेच ग्रंथपालांकडून त्यांना तांत्रिक साहाय्यही पुरवले जाणार आहे. एवढेच नव्हे तर मागणी केल्यास, ज्या महाविद्यालयांना अशा प्रकारच्या स्मार्ट पेजची निर्मिती करायची असेल तर त्यांनाही साहाय्य केले जाईल, असे संस्थेकडून सांगण्यात आले. या स्मार्ट पेजच्या उद्‌घाटन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, सचिव मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ऍड. आनंदराव भोसले, प्राचार्य डॉ. जी. बी. सारंग यांनी कौतुक केले होते. आता पुन्हा एकदा प्राचार्य व सर्व संस्था पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे, अभिनंदन केले आहे आणि विद्यार्थ्यांनी या स्मार्ट पेजचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहनही केले आहे. आपल्या संस्थेच्या महाविद्यालयात अशा प्रकारचे स्मार्ट पेज बनवले जाणे आणि त्याला परदेशातूनही मागणी येणे, ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे संस्थेचे सेक्रेटरी मंगेशभाई बुटाला यांनी सांगितले. 

हे पण वाचा - देवरुखात साकारले अवघ्या ३ सेमी मध्ये शिवराय; विलास ने केला सर्वात लहान रांगोळीचा विश्व विक्रम पार
 
या स्मार्ट पेजच्या निमित्ताने संस्था व महाविद्यालयाची ओळख परदेशामध्येही झाली, ही भूषणावह आणि आनंदाची बाब आहे. 
- आनंदराव भोसले, चेअरमन महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिल  कोकण कोकण कोकण 
 
अनेक बाबी एकाच पेजवर उपलब्ध 
ऑनलाइन पब्लिक ऍक्‍सेस कॅटलॉगही 
मोबाइलवर वापरता येण्याजोगे व कल्पक 
द. आफ्रिकेतील एस. आय. एम. टी. ऍक्राकडून मागणी 
एस. आय. एम. टी.ला तांत्रिक सहाय्यही पुरवणार 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT